Team Agrowon
जगभरातील बाजारपेठेत इराण, तुर्की या देशांतून सर्वाधिक बेदाणा निर्यात केला जातो. मात्र गेल्या वर्षी या दोन्ही देशांत बेदाणा निर्मितीसाठी पोषक वातावरण नसल्याने सुमारे ६० टक्के उत्पादन घटले त्यामुळे भारतीय बेदाण्याला मागणी वाढली.
२०२२-२३ मध्ये २६ हजार २२० टन तर २०२३-२४ मध्ये ४५ हजार ४३५ टन निर्यात झाली. दोन वर्षांपूर्वीच्या तुनलेत गतवर्षी १९ हजार २१५ टनांनी निर्यात वाढली आहे.
राज्यातून सुमारे ११४ देशांत बेदाण्याची निर्यात होते. प्रामुख्याने मोरोक्को, रोमानिया, रशिया, सौदी अरब, व्हिएतनाम, श्रीलंका, इंडोनेशिया देशातून महाराष्ट्रातील बेदाण्याला मागणी आहे.
राज्यातून चॉकलेटी आणि काळा बेदाणा प्रामुख्याने निर्यात होतो. हा निर्यात होणारा बेदाणा बेकरी पदार्थांसाठी वापरला जातो.
बेदाणा बेकरी पदार्थांसाठी वापरण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे बेदाण्याला मागणी चांगली आहे. त्यामुळे राज्यातून दरवर्षी कमीअधिक प्रमाणातला बेदाणा निर्यात केला जातो.
मुळात महाराष्ट्रातूनच इतर राज्यांत बेदाणा विक्री होतो. त्यामुळे इतर राज्यांतील निर्यातदारही बेदाण्याची निर्यात करतात.
देशातून गतवर्षी ४७ हजार ७५० टन बेदाण्याची निर्यात झाली आहे. त्यापैकी राज्यातून ४५ हजार ३३५ टन बेदाणा सात समुद्रापार पोहोचला आहे. देशातून होणाऱ्या एकूण निर्यातींपैकी ८० ते ८५ टक्के वाटा हा महाराष्ट्राचा आहे.