Silk Cocoon Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Silk Cocoon : बीडच्या बाजारपेठेत होते राज्यातून रेशीम कोषांची आवक

Market Update : बीड येथील बाजार समितीच्या आवारातील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेत राज्यातील विविध जिल्ह्यांतून रेशीम कोषांची आवक होते आहे. या कोषांच्या खरेदीसाठी पश्‍चिम बंगाल, कर्नाटकसह स्थानिक व्यापाऱ्यांची संख्या वाढत आहे.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Beed News : बीड येथील बाजार समितीच्या आवारातील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेत राज्यातील विविध जिल्ह्यांतून रेशीम कोषांची आवक होते आहे. या कोषांच्या खरेदीसाठी पश्‍चिम बंगाल, कर्नाटकसह स्थानिक व्यापाऱ्यांची संख्या वाढत आहे.

रेशीम कोष खरेदीचा बाजार राज्यात विविध ठिकाणी सुरू करण्याच्या अनुषंगाने पहिले पाऊल जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उचलण्यात आले. प्रायोगिक तत्त्वावर रेशीम कोष खरेदी बाजारपेठ सुरू करण्यात आली. त्यानंतर बीड, पूर्णा, बारामती व इतर ठिकाणीही राज्यात रेशीम कोष खरेदीच्या बाजारपेठा सुरू करण्यात आल्या.

परंतु आताच्या घडीला बीड येथील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेत येणाऱ्या कोषांची व त्यासाठी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या मोठी असल्याची स्थिती आहे. बीडच्या बाजारपेठेत मराठवाडा, खानदेश, पश्‍चिम महाराष्ट्र व विदर्भातून रेशीम कोषांची आवक होते.

या कोषांच्या खरेदीसाठी सुमारे ३५ व्यापारी दररोजच्या खरेदीला उपस्थित राहत असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. या व्यापाऱ्यांमध्ये पश्‍चिम बंगालमधील १७ ते १८, कर्नाटकातील १० ते १२ व स्थानिक ७ ते ८ व्यापारी सातत्याने खरेदीत सहभाग घेत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

सहा दिवसांत ३०२ क्विंटलपेक्षा जास्त आवक

बीडच्या रेशीम कोष खरेदी बाजारपेठेत ८ ते १४ जानेवारी या सहा दिवसांत ३०२ क्विंटलपेक्षा जास्त रेशीम कोषांची आवक झाली. यामध्ये ८ जानेवारीला ३३४९ किलो ७५० ग्रॅम आवक झालेल्या रेशीम कोषाला २३० ते ६६० रुपये प्रति किलो दरम्यान तर सरासरी ५५९ रुपये प्रति किलोचे दर मिळाले.

९ जानेवारीला १९६१ किलो ३०० ग्रॅम आवक झालेल्या रेशीम कोषांना २५५ ते ६४० रुपये प्रति किलो दरम्यान तर सरासरी ५५६ रुपये प्रति किलोचे दर मिळाले. १० जानेवारीला ४८९७ किलो ७०० ग्रॅम कोषांची आवक झाली. त्याचे दर २२० ते ६६५ रुपये प्रति किलो दरम्यान तर सरासरी ५६३ रुपये प्रति किलो राहिले.

११ जानेवारीला ४६५४ किलो ७०० ग्रॅम आवक झालेल्या रेशीम कोषांना १६० ते ६८० रुपये प्रति किलो दरम्यान तर सरासरी ५६६ रुपये प्रति किलोचे दर मिळाले. १३ जानेवारीला ११,४५३ किलो १०० ग्रॅम आवक झालेल्या कोषांना १५० ते ६९० रुपये प्रति किलो दरम्यान तर सरासरी ५५३ रुपये प्रति किलोचे दर मिळाले. १४ जानेवारीला ३८९४ किलो ९०० ग्रॅम आवक झालेल्या कोषांना २०० ते ६८५ रुपये प्रति किलो दरम्यान तर सरासरी ५१ रुपये प्रति किलोचे दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain Vidarbha : अमरावती-यवतमाळ जिल्ह्यांत ढगफुटीसदृश पाऊस

Crop Insurance : तीन लाख हेक्टरवरील पिकांना नाही विमा कवच

Heavy Rainfall Nanded : नांदेडमधील सिंदगी मंडलांत ढगफूटी

Public Lands: सार्वजनिक जमिनी हरवणार

Heavy Rain Parbhani : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६ मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT