Silk Cocoon Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Silk Cocoon Rates: बीडच्या बाजारात रेशीम कोष आवकेत तीन हजार क्विंटलने वाढ

Silk Cocoon Market: गतवर्षी २०२३-२४ मध्ये झालेल्या एकूण रेशीम कोष आवकेच्या तुलनेत २०२४-२५ मध्ये तीन हजार क्विंटलपर्यंतची वाढ आवकेत दिसून आली.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Beed News: मराठवाड्यातीलच नव्हे तर राज्यातील अग्रगण्य रेशीम कोष खरेदी बाजारपेठ म्हणून बीडची बाजारपेठ पुढे येत आहे. गतवर्षी २०२३-२४ मध्ये झालेल्या एकूण रेशीम कोष आवकेच्या तुलनेत २०२४-२५ मध्ये तीन हजार क्विंटलपर्यंतची वाढ आवकेत दिसून आली.

कर्नाटकातील रामनगरममध्ये रेशीम कोष विक्रीसाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातच बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून रेशीम कोष खरेदीचा पहिला प्रयोग जालना येथील बाजार समितीमध्ये सुरू करण्यात आला. त्यानंतर बीड, परभणी, बारामती आदी ठिकाणीही रेशीम कोष खरेदी बाजारपेठ सुरू झाली. सुरुवातीची दोन वर्षे चाचपडणाऱ्या बीड येथील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेने गत दोन-अडीच वर्षांत चांगलीच उभारी घेतली आहे.

२०२३-२४ मध्ये एप्रिल ते मार्च दरम्यान बीड बाजार समितीमध्ये सुरू करण्यात आलेल्या रेशीम कोष खरेदी बाजारपेठेत एकूण १३ लाख २८ हजार ९७१ किलो म्हणजे १३२८९ क्विंटल रेशीम कोषांची आवक झाली. गतवर्षीच्या तुलनेत १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ अखेर रेशीम कोषांची १६,५३६ क्विंटल आवक झाली. जी आजवरची सर्वाधिक आवक ठरली आहे. २०२३-२४ मध्ये सप्टेंबरनंतर तर यंदा २०२४-२५ या आर्थिक वर्षात मे, जूनचा अपवाद वगळता इतर महिन्यांमध्ये १००० क्विंटलपेक्षा जास्त आवक झाली.

सव्वाशेवर व्यापारी

बीडच्या रेशीम कोष खरेदी बाजारपेठेत सुमारे १३५ व्यापारी रेशीम कोष खरेदीसाठी येतात. यामध्ये कर्नाटकातील रामनगरमसह पश्चिम बंगाल, बेंगलोर, भंडारा, सांगली, लातूर, जालना, हिंदपूर, चीकबालपूर, सिलगटा, तमिळनाडू, कानपूर, बेलगाम, हुबडी, गुलबर्गा, हैदराबाद विजयवाडा आदी ठिकाणच्या व्यापाऱ्यांचा समावेश आहे. खरेदी झालेल्या रेशीम कोषांचे पैसे शेतकऱ्यांना आठवडाभराच्या आत त्यांच्या खात्यावर दिले जातात, असे बाजार समितीकडून कळविण्यात आले.

महिनानिहाय तुलनात्मक रेशीम कोष आवक-खरेदी (क्विंटलमध्ये)

महिना... २०२३-२४.... २०२४-२५

एप्रिल... ६९८.५८... १०७५.८९

मे ... ३२४४.४२... ५६२.४६

जून ... २०३.८६... ३०८.६१

जुलै ... १८६.२३.... १०५२.८१

ऑगस्ट... १८२.८४... १८२१.१७

सप्टेंबर ...१२३३.७९... १२९३.८४

ऑक्टोबर...९८०.५२... १५७४.७३

नोव्हेंबर ... १३६७.८७... १७३७.५०

डिसेंबर ... १४०९.३४... १५३९.३०

जानेवारी ...१३६२.२९... १२५३.०४

फेब्रुवारी ... ११३४.९३... ११८९.९९

मार्च .... १२८५.... ३१२७.३९

एकूण.... १३,२८९.७१...१६,५३६.७७

सरासरी दरातही वाढ

रेशीम कोष खरेदी बाजारपेठेत २०२३-२४ मध्ये किमान ११० ते कमाल ६५० रुपये प्रति किलोपर्यंत तर सरासरी ३७३ रुपये प्रति किलोचा दर रेशीम कोषांना मिळाला. २०२४-२५ मध्ये किमान दर किंचित कमी १०० रुपये प्रति किलो तर कमाल दर ७९५ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचल्याने सरासरी दर ४८९ रुपये प्रतिकिलोपर्यंत राहिल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली.

बाजार समितीमध्ये सुरू करण्यात आलेल्या रेशीम कोष खरेदी बाजार पेठेत रेशीम कोषांची आवक सातत्याने वाढते आहे. मालाची आवक पाहता शेडची आवश्यकता आहे. शेडमध्ये इतर आवश्यक सुविधा देण्यासह कंपाउंड वॉल, फिल्टर प्लांट बसवण्याचे नियोजित आहे. एक सुरक्षारक्षक सातत्याने ठेवतो आहे.
बाळासाहेब जाधव, सचिव, बाजार समिती बीड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Samruddhi Yojana: पैशाचे सोंग आणता येत नाही

Electricity Bill Recovery: महावितरणकडून वीजबिल वसुलीची मोहीम तीव्र

Water Rate Extension: पाण्याच्या दरनिश्चितीला मुदतवाढ

Panchanama Scam: ग्रामसेविकेने नुकसानभरपाईत मागितला शेतकऱ्याला वाटा

Gram Rozgar Assistant: ग्रामरोजगार सहायकांवर उपासमारीची वेळ

SCROLL FOR NEXT