Cotton Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Kapus Bajarbhav : कापसाच्या भावात तेजीचे संकेत; पॅनिक सेलिंग टाळण्याची गरज, कापसाच्या भावात आठवडाभरात सुधारणा

Cotton Rate : कापसाच्या भावात मागील आठवडाभरात काहिशी सुधारणा दिसून आली. आज सरासरी भाव ७ हजार ते ७ हजार ३०० रुपये होता. तर कमाल सरासरी भाव ७ हजार ५०० रुपयांवर पोचला.

Anil Jadhao 

Pune News : कापसाच्या भावात मागील आठवडाभरात काहिशी सुधारणा दिसून आली. आज सरासरी भाव ७ हजार ते ७ हजार ३०० रुपये होता. तर कमाल सरासरी भाव ७ हजार ५०० रुपयांवर पोचला. ही परिस्थिती शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन शक्यतो हमीभावापेक्षा कमी दरात विक्री टाळावी.

कारण बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरात आणखी सुधारणा होऊ शकते. फेब्रुवारीनंतर दरात चांगली सुधारणा होण्यास पोषक परिस्थिती आहे. त्यामुळे बाजारातील अफवांना बळी न पडता गरजेनुसार बाजाराकडे लक्ष ठेऊन टप्प्याटप्प्याने विक्री करावी, असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे.

कापसातील ओलावा कमी झाला, गुणवत्ता चांगली आहे, सीसीआयदेखील कापसाची खरेदी करत आहे. त्यामुळे बाजाराला हमीभावाचा एक आधार आहे. बाजारातील सध्याचा सरासरी भाव ७ हजारांच्या पुढे दिसतो. कापसाची सरासरी भावपातळी आज ७ हजार ते ७ हजार ३०० रुपये होती. आता खेडा खेरदी आणि छोट्या बाजारांमध्ये कदाचित हा भाव दिसला नसेल.

पण कापसाचा सरासरी भाव आता या पातळीवर पोचला. मागील आठवड्याच्या तुलनेत भाव २०० रुपयांनी वाढले आहेत. विशेष म्हणजे बाजारातील आवकही वाढत आहे. म्हणजेच आवक वाढत असतानाच कापसाचा भावही वाढत आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे उत्पादनातील घट हे आहे.

बाजारातील कापसाची आवक आज शिगेला पोचली. कापूस आवक २ लाख गाठींच्या जळप पोचली आहे. मागील आठवड्यात दीड लाख गाठींच्या दरम्यान असलेली आवक आता २ लाख गाठींकडे वाटचाल करत आहे. एकिकडे आवक वाढत असतानाच कापसाच्या भावातही सुधारणा दिसून येत आहे. कारण सध्या बाजारात येणाऱ्या कापसाची गुणवत्ता चांगली आहे. ओलावा देखील कमी होत आहे. त्यामुळे दराला आधार मिळत आहे.

सीसीआय बाजारात कापूस खरेदीत उतरलेला आहे. मागील आठवड्यापर्यंत कापसात ओलावा अधिक होता. पावसात भिजलेला कापूस होता. त्यामुळे गुणवत्ता कमी होती. हा कापूस सीसीआयने खरेदी केला नाही. त्यामुळे हा कापूस शेतकऱ्यांना खुल्या बाजारात विकण्यावाचून पर्याय नव्हता. पण आता कापसातील ओलावा कमी झाला. बाजारात येणाऱ्या कापसाची गुणवत्ताही चांगली आहे. त्यामुळे कापसाच्या भावात सुधारणा दिसून आली. सीसीआयची खरेदी देखील सुरु झाली. म्हणजेच गुणवत्तेच्या कापसाला ७ हजार ५२१ रुपये हमीभवाचा आधार आहे.

यंदा देशातील उत्पादन कमी झाले. मागणी मात्र टिकून आहे. उत्पादन नेमके किती कमी झाले हे पुढच्या महिनाभरात स्पष्ट होईल. पण यंदा भारतावर कापूस आयात करण्यावर वेळ आली आहे. भारत आयात वाढवेल तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारातही दरवाढीला मदत होईल. बाजारातील ही परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी कापूस विक्रीचे नियोजन करणे आवश्यक आहे.

सध्या कापूस बाजारात काही अफवा आहेत. पण कापसला हमीभावाचा आधार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभावाच्या खाली कापसाची विक्री टाळावी. पुढच्या काळात कापूस भावात सुधारणा होण्याला पोषक स्थिती आहे. बाजारातील परिस्थितीवरून तसे संकेत मिळत आहेत. त्यामुळे टप्प्याटप्प्याने विक्री करणे फायदेशीर ठरेल, असेही अभ्यासकांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: उसाचा १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने जमा करा अन्यथा आंदोलन, 'स्वाभिमानी'चा कारखान्यांना इशारा

Parbhani Dam Water Update: परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ११, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के पाणीसाठा

Turmeric Farmers Support: हळदीला विमा संरक्षणाने शेतकऱ्यांना दिलासा

Fertilizer Dealers Complaint: खत विक्रीत लिंकिंगचा आरोप

Women Farmers: ‘वसंधुरा’च्या महिलांकडून सायकल कोळप्याने कोळपणी

SCROLL FOR NEXT