Gold Market Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Gold Market : सोने दरात वाढीचा कल

Gold Silver Market Rate : सोनेदरात १५ ते १६ दिवसांनंतर एक तोळ्यामागे (१० ग्रॅम) ३०० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली.

Chandrakant Jadhav

Jalgaon News : सोनेदरात १५ ते १६ दिवसांनंतर एक तोळ्यामागे (१० ग्रॅम) ३०० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली. काही दिवसांवर आलेल्या दसरा, दिवाळी सणांच्या काळातही सोने दरात वाढीचाच कल राहील, असे सराफा बाजारातील व्यावसायिकांनी सांगितले. हमास व इस्त्रायल यांच्यात निर्माण झालेल्या युद्धस्थितीचाही सोने दरावर परिणाम झाला असल्याचे सांगितले जात आहे.

मागील १५ दिवस सोने व चांदीच्या दरात सतत घसरण सुरू होती. सोन्याचा दर (२४ कॅरेट) ५९ हजार रुपये प्रतितोळ्यांवर पोहोचला होता. तो दोन आठवड्यांत ५७ हजार रुपये प्रतितोळा, असा खाली आला. तसेच चांदीचे दर मागील महिन्यात ७४ हजार रुपये प्रतिकिलो, असे होते.

त्यातही मागील काही दिवस घसरण सुरू होती. चांदी दर ६९ हजार रुपये प्रतिकिलो, असे खाली आले होते. सणासुदीतही सोने व चांदी दरात नरमाई राहील, अशी अपेक्षा ग्राहकांना होती. परंतु हमास आणि इस्राईल यांच्यातील युद्धाची स्थिती तयार होताच सोने व चांदीचे दर वाढू लागले आहेत.

एकाच दिवसात म्हणजेच शनिवारी (ता. ७) सोने दरात एका तोळ्यामागे ३०० रुपयांची वाढ झाली असून, सोने दर ५७ हजार ९०० रुपये प्रतितोळ्यापर्यंत पोहोचले आहेत. चांदीचे दरही एक किलोमागे ६०० रुपयांनी वाढून ६९ हजार ५०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले.

मागील आठवड्यात सोने व चांदीच्या दरात सतत घट झाली. सहा महिन्यांतील नीचांकी दर पातळी सोने व चांदी दराने गाठली होती. विशेषतः गणेशोत्सवाच्या काळानंतर दर कमी झाले.

पितृपक्षात अनेक जण सोने-चांदी, धातूंची खरेदी टाळतात. याचाही परिणाम बाजारात दिसत होता. परंतु हमास व इस्राईल यांच्यातील युद्धस्थितीदरम्यान अमेरिकेनेही आपली भूमिका जाहीर केली. सध्या हमास आणि इस्राईल यांच्यात तणावाची स्थिती तयार झाल्याने याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावरही झाल्याचे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Geo Tagging Inspection: पथकाकडून विमा संरक्षित बागांची पाहणी

Agricultural Pumps: कृषी पंपांना मिळेना अखंडित वीजपुरवठा

Illegal Sand Mining: अवैध वाळू उपशाविरोधात महसूल विभागाची कारवाई

Threshing Season: रायगड जिल्ह्यात ‘मळणी’चा उत्सव सुरू

Agriculture Bhavan: अमरावतीच्या कृषी भवनला हवा इच्छाशक्‍तीचा टेकू 

SCROLL FOR NEXT