Sugar Factory  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Jute Sugar Packing : ताग पॅकिंगची माहिती देण्यास कारखान्यांची नकारघंटा

Sugar Mills : साखर पॅकिंगसाठी ज्यूट (ताग) पिशव्या वापरण्याबाबत केंद्राने साखर कारखान्यांना पुन्हा एकदा निर्वाणीचा इशारा दिला आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : साखर पॅकिंगसाठी ज्यूट (ताग) पिशव्या वापरण्याबाबत केंद्राने साखर कारखान्यांना पुन्हा एकदा निर्वाणीचा इशारा दिला आहे. अनेक कारखान्यांनी तागाच्या पॅकिंगकडे अजूनही दुर्लक्ष केल्याने केंद्र सरकार कारवाईच्या भूमिकेवर ठाम आहे. जर कारखान्यांनी तागाचे पॅकिंग केले नाही तर त्यांचा साखर कोटा अडविण्याचा दमही दिला आहे.

८ जानेवारीला अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुनीलकुमार स्वर्णकर यांनी याबाबतचे पत्र कारखान्यांना दिले आहे. याची प्रत इस्मा (इंडियन शुगर मिल्स असोसिएशन), तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघालाही देण्यात आली आहे. ज्यूट आणि एचडीपीई बॅग पॅकिंगच्या मानकासंदर्भात कारखान्यांनी गंभीर राहावे, असेही या पत्रात म्हटले आहे.

या विभागाने २१ डिसेंबर २०२३ ला साखरेच्या एकूण पॅकिंगपैकी २० टक्के पॅकिंग तागाच्या पिशव्यात करण्याबाबतचे निर्देश कारखान्यांना दिले होते. साखरेसाठी हे पॅकिंग महागडे ठरते. साखरेच्या टिकाऊपणासाठी तागाच्या पिशव्या उपयुक्‍त ठरत नसल्याचे कारण देत पॅकिंग करणे टाळले होते. या आदेशानंतर पंधरा दिवस आढावा घेऊन विभागाने पॅकिंग सक्‍ती करण्याबाबत नव्याने आदेश काढले आहेत.

केंद्राने कारवाईचा इशारा दिला असला तरी कारखान्यांची या पॅकिंगबाबतची नकारघंटा कायम आहे. साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन तीन ते चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे.

देशातील साखर कारखाने येथून पुढे दोन ते तीन महिने चालतील अशी शक्‍यता आहे. निम्मा हंगाम संपल्यानंतर हे आदेश येत असल्याने याची कार्यवाही पूर्ण क्षमतेने होण्याची शक्यता कमी असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.

ताग पॅकिंगबाबतीत प्रत्येक वर्षी आदेश निघतो. पण कोणतेही कारखाने हा आदेश गांभीर्याने घेत नाहीत. यंदा केंद्राने १० जानेवारीपर्यंत पॅकिंग विषयीची माहिती पोर्टलवर भरण्यास सांगितले होते. पण कारखान्यांनी ही माहिती न भरल्याने केंद्राने मुदतीपूर्वीच हे पत्र कारखान्यांना पाठविले आहे.

केंद्रानेही यापूर्वी हे पॅकिंग न करणाऱ्या कारखान्यावर कोणतीही कारवाई केली नाही. यंदा मात्र ठरावीक दिवसाच्या अंतराने कारवाईचा इशारा देणारे स्मरणपत्र केंद्र काढत आहे. केंद्र या पॅकिंगबाबतीत गंभीर असून जर कारखान्यांनी आदेश पाळला नाही तर अशा कारखान्यांवर साखर कोटा न देण्याविषयीची कारवाई करण्यात येईल, असे अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

Maharashtra Assembly Election Result 2024 : ‘ते’ पुन्हा आले!

Vidhansabha Election 2024 : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत महायुतीचाच प्रभाव

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT