Squid Fish Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Fish Market : म्हाकुळ माशाच्या दरात घट

Squid Fish Rate : खोल समुद्रात निर्माण झालेल्या वादळाने अजस्र लाटा उसळलेल्या आहेत. वातावरण बिघडल्यामुळे मुंबईसह हर्णै, दापोलीतील सुमारे चारशेहून अधिक मच्छीमारी नौकांनी सुरक्षेसाठी जयगड बंदराचा आसरा घेतला आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : जयगड बंदरात सुरक्षेसाठी नांगर टाकून उभ्या असलेल्या परजिल्ह्यातील मच्छीमारांनी नौकांवरील म्हाकुळची ५० ते ६० रुपये किलोने दलालांना विक्री केली. परिणामी म्हाकुळाच्या दरात मोठ्या प्रमाणात घट होत असून स्थानिक मच्छीमारांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. परजिल्ह्यातील मच्छीमारांकडून जयगड बंदरात उतरवल्या जाणाऱ्या मासळीकडे मत्स्य विभागाने वेळीच लक्ष देणे आवश्यक असल्याचे मच्छीमारांचे मत आहे.

खोल समुद्रात निर्माण झालेल्या वादळाने अजस्र लाटा उसळलेल्या आहेत. वातावरण बिघडल्यामुळे मुंबईसह हर्णै, दापोलीतील सुमारे चारशेहून अधिक मच्छीमारी नौकांनी सुरक्षेसाठी जयगड बंदराचा आसरा घेतला आहे. गेले चार दिवस वातावरण निवळलेले नाही. हंगामाच्या सुरुवातीलाच चिंगळांबरोबरच बंगर म्हाकुळ जाळ्यात सापडत आहे. एका नौकेला सुमारे दीड ते दोन टन म्हाकूळ मिळाल्यामुळे मच्छीमारही सुखावलेले होते. परंतु वादळामुळे परजिल्ह्यातील मच्छीमारांना जयगड बंदरात अडकून पडावे लागले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार वादळ निवळण्यास आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. नौकांमध्ये असलेले म्हाकूळ खराब होण्याची शक्यता लक्षात घेऊन जयगड बंदरात अडकलेल्या परजिल्ह्यातील मच्छीमारांनी पकडलेले म्हाकूळ दलालांना विकण्यास सुरुवात केली. एका किलोला ५० ते ६० रुपये दर आकारला जात असल्याची तक्रार काही स्थानिक मच्छीमारांनी केली.

बंपर म्हाकूळ जाळ्यात लागल्याने त्याला चांगला दर मिळाल्यास सुरुवातीलाच मोठा आर्थिक फायदा मिळेल, अशी जयगड बंदरातील मच्छीमारांना होती. परंतु, परजिल्ह्यातील मच्छीमारांनी त्यांच्या स्वप्नांवर पाणी पाडले. मोठ्या प्रमाणात म्हाकूळ दलालांना मिळाल्याने भविष्यातील दरावर मोठा परिणाम होणार आहे. गतवर्षी म्हाकूळाचा किलोचा दर तीनशे रुपये होता. मात्र सुरुवातीलाच कवडीमोलाचा दर मिळाल्याने स्थानिक मच्छीमारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

परजिल्ह्यातील आश्रयाला आलेल्या नौका जेट्टीवर आणून त्यातील मासळी उतरवून घेण्याच्या प्रकाराकडे मत्स्य विभागाकडून काणाडोळा करण्यात येत असल्याचे मच्छीमारांचे मत आहे. त्यांच्यावर वेळीच नियंत्रण ठेवले पाहिजे होते. त्यामुळे पुढील हंगामात मच्छीमारांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.

दरम्यान, जयगड बंदरात उभ्या असलेल्या मच्छीमार नौकांना लागणारे अन्न व पाणी स्थानिका मच्छीमार पुरवीत आहेत. वादळाच्या परिस्थितीत त्या परजिल्ह्यातील मच्छीमारांना मदत करण्यात स्थानिक कुठेही कमी पडलेले नाहीत.

म्हाकूळची निर्यात

म्हाकूळला देशातच नव्हे परदेशातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. खाण्यासाठी सर्वाधिक उपयोग होतो. कोल्डस्टोरेजमध्ये म्हाकूळ साठवून ठेवून योग्य दर मिळाल्यानंतर त्याची विक्री केली जाईल. हा मासा मोठ्या प्रमाणात निर्यात करतात. सध्या हाती आलेल्या बंपर म्हाकूळमुळे दलालांना मोठा फायदा होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.

गेले चार दिवस वातावरण बिघडल्यामुळे परजिल्ह्यातील मच्छीमार नौका जयगड बंदरात आलेल्या आहेत. त्यांनी नौकेवरील म्हाकूळ दलालांना विक्री करण्यास सुरू केला आहे. त्यामुळे दलालांकडे मोठ्या प्रमाणात म्हाकूळ उपलब्ध राहील. भविष्यात म्हाकूळ विक्री होत राहिली तरीही त्या वेळी अपेक्षित दर मिळणार नाही. हंगामाच्या सुरुवातीलाच मच्छीमारांना दणका बसलेला आहे.
- शराफत गडबडे, मच्छीमार, जयगड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Legislative Assembly: कृषिमंत्री कोकाटे यांची पावसाळी अधिवेशनाकडे पाठ

Pune APMC Scam: बाजार समिती संचालकांची ‘ईडी’मार्फत चौकशी करा

Guru Pournima 2025: गुरुपौर्णिमेला गुरुकुंजात गुरुदेवभक्तांची मांदियाळी

Pomegranate Price: डाळिंबाच्या एका क्रेटला साडेसहा हजार रुपये दर

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील गैरप्रकार बिहारमध्ये चालू देणार नाही

SCROLL FOR NEXT