Sugar Mill
Sugar Mill Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugarcane Crushing : गेल्या गळीत हंगामात विक्रमाच्या राशी

Raj Chougule

कोल्हापूर : देशाने गेल्या साखर हंगामात (Sugarcane Season) नेत्रदीपक प्रगती केली आहे. (ऑक्टोबर २०२१ ते सप्टेंबर २०२२) अखेर ५००० लाख टन उसाचे विक्रमी गाळप (Record Sugarcane Crushing) झाले आहे. त्यापैकी सुमारे ३५७४ लाख टन उसाचे गाळप साखर कारखान्यांनी केले आहे. अन्य ऊस गूळनिर्मिती (Jaggery Production) व अन्य कारणांसाठी वापरण्यात आला. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालयाने नुकतीच ही माहिती दिली.

जगातील सर्वांत मोठा साखर उत्पादक व सर्वाधिक ग्राहक असलेला देश, म्हणून भारत उदयाला आला आहे, साखर निर्यातीतही भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. या निर्यातीतून देशासाठी ४० हजार कोटी रुपयांचे परकीय चलन प्राप्त झाले. इथेनॉल उत्पादनासाठी ३५ लाख टन साखरेचा वापर झाला.

तर साखर कारखान्यांकडून ३५९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे १०९.८ लाख टन साखरेची विक्रमी निर्यात झाली. आधारभूत आंतरराष्ट्रीय किमती आणि भारत सरकारच्या धोरणामुळे ही निर्यात शक्य झाल्याचे केंद्राने म्हटले आहे.

इथेनॉलच्या विक्रीतून साखर कारखाने व डिस्टिलरीजना १८ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न यामुळे शेतकऱ्यांची उसाची थकबाकी लवकरात लवकर देण्यात मोठी मदत झाली. उसाची मळी, साखर-आधारित डिस्टिलरीजची इथेनॉल उत्पादन क्षमता वर्षाला ६०५ कोटी लिटरपर्यंत वाढली आहे आणि पेट्रोलसोबत इथेनॉल मिश्रण कार्यक्रमांतर्गत २०२५ पर्यंत २० टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या दिशेने प्रगती सुरू आहे.

साखर हंगाम २०२१-२२ मध्ये साखर कारखान्यांनी १.१८ लाख कोटींहून अधिक किमतीचा ऊस खरेदी केला. भारत सरकारकडून कोणतेही आर्थिक साह्य (अनुदान) न घेता १.१२ लाख कोटींहून अधिक पैसे चुकते केले. साखर हंगामाच्या शेवटी उसाची थकबाकी ६,००० कोटी रुपयांपेक्षा कमी राहिली.

उसाची ९५ टक्के थकबाकी चुकती झाल्याने गेल्या हंगामात शेतकऱ्यांना याचा मोठा आधार झाला. बहुतांशी ऊस उत्पादक राज्यांमध्ये थकबाकीचे प्रमाण कमी राहिल्याने शेतकऱ्यांना गेल्या वर्षी उसापासून चांगले उत्पन्न मिळाल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. एकूणच साखरेच्या उत्पादनापासून ते उपपदार्थांच्या विक्रीपर्यंत साखर उद्योगाने चांगली मजल मारल्याचे मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Turmeric Seed : छत्तीसगडला ‘एमपीकेव्ही’च्या हळद बियाण्याची भुरळ

Kharif Season 2024 : ‘वनामकृवि’च्या खरीप बियाणे विक्रीचा शनिवारी प्रारंभ

Turmeric Cultivation : हळदीची लागवड वाढणार

Straight Cotton Variety : सरळ कापूस वाण यंदाही अल्प

Karvand Market : डोंगरची काळी मैना बाजारात दाखल

SCROLL FOR NEXT