Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : लातूरच्या बाजारात सोयाबीनची विक्रमी आवक

Soybean Rate : दिवाळी सणाचा उत्साह सुरू असतानाचा बाजाराच सोयाबीनची आवक वाढली असून दोन दिवसांत पंधरा हजार क्विंटलने वाढ झाली आहे.

विकास गाढवे

Latur News : दिवाळी सणाचा उत्साह सुरू असतानाचा बाजाराच सोयाबीनची आवक वाढली असून दोन दिवसांत पंधरा हजार क्विंटलने वाढ झाली आहे. सोमवारी (ता. ४) बाजारात ४९ हजार ११ क्विंटल आवक झाली होती. आवक वाढली तरी किमान व कमाल भाव स्थिर आहेत. यात हभीभावाने खरेदीसाठी अजून म्हणावा तेवढा वेग आला नसल्याने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसत आहे.

मागील तीन वर्षांचा अनुभव लक्षात घेता यंदा सोयाबीनच्या भाववाढीची आशा शेतकऱ्यांना उरली नाही. यामुळे तातडीच्या आर्थिक गरजांसोबत रब्बीच्या पेरणीच्या खर्चासाठी शेतकरी सोयाबीनची विक्री करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. मळणी होताच त्याची साठवणूक न करता ते थेट बाजारात विक्रीसाठी आणले जात आहेत.

बाजारात सोयाबीनला काही दिवसापासून कमाल चार हजार ५६५ तर किमान तीन हजार नऊशे रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. कमाल व किमान भाव स्थिर असून दुसरीकडे जिल्ह्यात १४ केंद्र सुरू होऊनही एकाही केंद्रावर हमीभावाने सोयाबीन खरेदीचा उत्साह नाही. बारदाना व मॉईश्चरची कारणे पुढे केली जात आहे.

यातच पाडव्यादिवशी शनिवारी (ता. २) बाजारात ३५ हजार ८७२ क्विंटल आवक झाली होती. कमाल भाव चार हजार ५६५, किमान भाव तीन हजार नऊशेचा भाव सोमवारी (ता. ४) कायम होता. सोमवारी बाजारात यंदाच्या हंगामातील विक्रमी ४९ हजार ११ क्विंटल आवक झाली होती.

दरम्यान मागील वर्षी दिवाळीत सोयाबीनला पाच हजार रुपये क्विंटल भाव मिळाल्याच्या आठवणी शेतकऱ्यांनी सांगितल्या. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये पहिल्या आठवड्यात सोयाबीनला चार हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल भाव होता.

दिवाळी पाडव्या दिवशी सोयाबीनला पहिल्यांदाच पाच हजार रुपये क्विंटल भाव मिळाला. तर पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी १६ नोव्हेंबरला ६४ हजार २६४ क्विंटल सोयाबीनची आवक होऊन कमाल भाव पाच हजार ३५१ तर किमान चार हजार ५६५ रुपये भाव मिळाला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Price Issue: कापसाचे दर पडण्यास शासन जबाबदार

Banana Price: गुणवत्ता निकषावर मालाला मिळणार दर

Agriculture Technology: नव्या तंत्रज्ञानामुळे देशात कृषी क्षेत्रात क्रांती

Global Sugar Production: जागतिक बाजारात साखर पुरवठा वाढणार

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

SCROLL FOR NEXT