Onion Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion MSP : कांदा हमीभावासाठी शेतकरी संघटनेतर्फे पुन्हा ‘रास्ता रोको’

केंद्र व राज्य शासनाने कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव जाहीर करावा, अन्यथा पुढील दिवसांत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला.

टीम ॲग्रोवन

देवळा, जि. नाशिक : कांद्याचे भाव (Onion Rate) कोसळत असताना केंद्र व राज्य शासन बघ्याची भूमिका घेत असल्याच्या निषेधार्थ आणि त्यामुळेच या ज्वलंत प्रश्‍नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (ता. ३०) देवळा पाचकंदील येथे शेतकरी संघटनेच्या वतीने तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko Protest) छेडण्यात आले. यामुळे विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती.

केंद्र व राज्य शासनाने कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव (Onion MSP) जाहीर करावा, अन्यथा पुढील दिवसांत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. आंदोलनात शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून घेत व घोषणा देत शासनाचा निषेध नोंदवला. या वेळी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष देविदास पवार, जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख शशिकांत भदाने, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर जाधव, किरण पाटील, बाळासाहेब चौधरी आदी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा म्हणून भूमिका मांडल्या.

देविदास पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारने या विषयावर हस्तक्षेप करून तोडगा काढला पाहिजे, अशी मागणी केली. राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्कप्रमुख कुबेर जाधव यांनी सांगितले, की सर्व शेतकरी संघटना एकत्र आल्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्‍न मार्गी लागणार नाहीत. कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा यासाठी भविष्यात राष्ट्रीय महामार्ग बंद पाडायची वेळ आली तरी मागे हटणार नसल्याचे ठामपणे सांगितले.

शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे, प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ आदी पदाधिकाऱ्यांसह शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते फुला जाधव, दादाजी जाधव, बाळासाहेब शेवाळे, शांताराम जाधव, शरद जोशी विचार मंचचे विनोद पाटील, प्रवीण आहीरे, शैलेंद्र कापडणीस, माणिक निकम आदींसह शेकडो कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कांदा भरलेल्या बैलगाड्या आंदोलन स्थळी आणल्या होत्या. या वेळी शेतकरी संघटनेच्या वतीने देवळ्याचे तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना निवेदन देत रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. पोलिस निरीक्षक दिलीप लांडगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

प्रमुख मागण्या :

-कांदा भावात सुधारणा व्हावी यासाठी कांदा निर्यात खुली असावी.

-कांद्याला प्रतिक्विंटल किमान तीन हजार रुपये भाव मिळावा.

-शेतीसाठी दिवसा वीज मिळावी.

-शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करत नुकसानभरपाई मिळावी.

चौकट ----

...तर कांदाप्रश्‍न अजूनच पेटणार

उत्पादन खर्चापेक्षा खूपच कमी बाजारभाव मिळत असल्याने तोटा सहन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यात कांद्याचा भाव घसरल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्याचीच परिणती म्हणून देवळा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जर कांद्याची भाववाढ झाली नाही तर आंदोलनांची मालिका सुरूच राहील, असे स्पष्ट निर्देश संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्याने कांदाप्रश्‍न पेटणार असे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT