Raisins Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Bedana Market: बेदाणा दरात झपाट्याने वाढ! प्रति किलो २५ रुपयांची वाढ

Bedana Price : बेदाणा निर्मितीचा हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले, परंतु बाजारात बेदाण्याची आवक जेमतेमच आहे. त्यामुळे मागणी वाढली असून, पंधरा दिवसांत बेदाण्याच्या दरात प्रति किलोस २५ रुपयांची वाढ झाली आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News: बेदाणा निर्मितीचा हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले, परंतु बाजारात बेदाण्याची आवक जेमतेमच आहे. त्यामुळे मागणी वाढली असून, पंधरा दिवसांत बेदाण्याच्या दरात प्रति किलोस २५ रुपयांची वाढ झाली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून आवक वाढेल आणि दरही वाढतील असा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

यंदा बेदाणा निर्मितीला द्राक्षटंचाई भासू लागली आहे. त्यामुळे बेदाणा निर्मिती संथगतीने सुरू आहे. परिणामी, बाजारपेठेत बेदाण्याची आवक कमीच दिसून येत आहे. सद्यःस्थितीला सांगली बाजार समितीत प्रत्येक सौद्याला २० टन, तर तासगाव बाजार समितीत २० टन अशी एकूण चाळीस टनापर्यंत बेदाण्याची आवक होत आहे. बेदाण्याची आवक कमी असल्याने बेदाण्याचा उठाव चांगला होत आहे.

दरम्यान, नवा बेदाणा विक्रीस येऊन पंधरा दिवसांचा कालावधी झाला आहे. नव्या बेदाण्याला प्रति किलोस ७० ते २२५ रुपये असा दर होता. त्यानंतर बेदाण्याची मागणी वाढली आहे. पंधरा दिवसांत बेदाण्याच्या दरात प्रति किलोस २५ रुपये इतका दर वाढला आहे. त्यामुळे हंगामाच्या प्रारंभापासून बेदाण्याला चांगले दर मिळत आहे.

गत वर्षीचा ५ हजार टन बेदाणा शिल्लक असल्याचा अंदाज व्यापारी वर्गाने वर्तविला आहे. गत वर्षीचा बेदाणा अजूनही विक्रीसाठी येत आहे. सध्या या बेदाण्यालाही दर चांगले मिळत आहे. या बेदाण्याची विक्री या पंधरा ते वीस दिवसांत पूर्ण होईल.

दर वाढण्याची शक्यता

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात महाशिवरात्र, त्यानंतर रमजान ईद, होळी हे सण येत आहेत. या सणानिमित्त देशभरातून बेदाण्याला मोठी मागणी असते. त्यामुळे बेदाणा निर्मितीचे नियोजन शेतकरी त्यानुसार करतो. या दरम्यान, बेदाण्याचा उठावही मोठ्या प्रमाणात होत असून दरही चांगले मिळतात. यंदा या सणाच्या पार्श्‍वभूमीवर बेदाण्याचे दर वाढतील असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

‘उच्चांकी दराची भुरळ नको’

शेतकरी नवीन बेदाणा विक्रीस घेऊन येऊ लागला आहे. सौदे करतेवेळी व्यापाऱ्यांकडून उच्चांकी दर काढून शेतकऱ्यांना बेदाणा विक्रीसाठी भुरळ घालतात. त्यामुळे दर जादा मिळत असल्याने शेतकरी बेदाणा विक्रीसाठी पुढे येतात. मात्र उच्चांकी दर जाहीर करण्यापेक्षा सरासरी दर किती मिळतो हे जाहीर करावी अशी मागणी बेदाणा उत्पादक शेतकरी करू लागले आहेत.

बेदाणा दर (प्रति किलो)

हिरवा बेदाणा १७० ते २५०

पिवळा बेदाणा १६० ते २००

काळा बेदाणा ७० ते ११०

हंगामाच्या प्रारंभापासून बेदाण्याला चांगली मागणी आहे. सध्या आवक जेमतेम असल्याने दरही चांगले आहेत. येणाऱ्या सणामुळे बेदाण्याची मागणी वाढणार असून दरही वाढतील अशी आशा आहे.
सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dr. Anand Nadkarni : मनाला दिलासा देणारा आवाज हरपला; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे दुःखद निधन

Social Initiatives: सामाजिक कामांतही हवा कार्यक्षमतेचा, परताव्याचा विचार

Gender Equality: लैंगिक समानतेसाठी धोरणात्मक बदल अपरिहार्य

Non MSP Recommendations: बिगर हमीभाव शिफारशींचे काय ?

Baliraja Farm Road Scheme: मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी : जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT