Banana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Market : रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू

Banana Rate : रावेर रेल्वे मालधक्क्यावरून दिल्ली येथे रेल्वेने केळी पाठवणूक सात महिन्यांच्या खंडानंतर सुरू झाली आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Satara News : रावेर रेल्वे मालधक्क्यावरून दिल्ली येथे रेल्वेने केळी पाठवणूक सात महिन्यांच्या खंडानंतर सुरू झाली आहे. या वाहतुकीसाठी केंद्र, रेल्वेने ५० टक्के अनुदान द्यावे, अशी मागणीदेखील पुन्हा पुढे आली आहे.

सात महिने रेल्वेने केळीची दिल्ली किंवा उत्तरेकडील पाठवणूक बंद होती. ती पुन्हा सुरू झाली आहे. फळबागायतदार शेतकरी युनियनने त्यासाठी रेल्वेकडे मागणी केली होती. ही पाठवणूक गुरुवारी (ता.२५) नियोजित होती. परंतु रेल्वेला काही अडचणी आल्याने रॅक उपलब्ध होऊ शकला नाही. शुक्रवारी (ता.२६) रेल्वेने केळीची पाठवणूक करण्यात आली.

केळीची आवक रावेर, यावल, मुक्ताईनगर भागात वाढली आहे. केळीच्या उत्तर भारतातील पाठवणुकीसाठी ट्रकही उपलब्ध होत नाहीत. या स्थितीत केळी उत्पादक, संघटनेने रेल्वे वॅगनचा पर्याय निवडला आहे. परंतु यासाठी पूर्ण भाडे पाठवणूकदारांना द्यावे लागत आहे. पूर्वी ५० टक्के अनुदान या पाठवणुकीसाठी रेल्वेतर्फे मिळत होते.

या वाहतुकीसाठी रेल्वेने व्हीपीयू प्रकारच्या वॅगन्स उपलब्ध करून दिल्या आहेत. आता दर आठवड्यात दोन वेळेस रेल्वे रॅक केळी पाठवणुकीसाठी रावेर रेल्वे स्थानकावर उपलब्ध होईल. एका रॅकला १५ वॅगन्स असतील.

त्यात एकूण साडेतीन हजार क्विंटल केळी पाठविता येईल. एका वॅगनसाठी ६९ हजार ३७१ रुपये भाडे याप्रमाणे पूर्ण रॅकसाठी १० लाख ५० हजार रुपये भाडे केळी पाठवणूकदारांना द्यावे लागेल. ही केळी ३६ तासांच्या प्रवासानंतर दिल्ली येथील नया आझादपूर रेल्वे स्थानकात पोहोचेल.

केळी वॅगनला भाडे द्या

केळी ट्रकने दिल्ली येथे पाठविण्यासाठी एक क्विंटलमागे ६१० रुपये खर्च येतो. हा खर्च कमी दर असल्यास परवडत नाही. यामुळे केळीची उत्तर भारतात पाठवणूक रेल्वेने बारमाही केली जावी व त्यासाठी ५० टक्के अनुदान दिले जावे, अशी मागणी फळबागायतदार युनियनचे रामदास पाटील यांनी केली आहे.

दिल्ली येथे केळीच्या पाठवणुकीप्रसंगी युनियनचे किशोर गनवानी, आर. आर. पाटील, नितीन गनवानी, संजय पाटील, सुरेश गनवानी, मिलिंद पाटील आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT