Cotton Bale Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Bale Production : खानदेशात २२ लाख कापूसगाठींचे उत्पादन शक्य

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात यंदा कापसाचे उत्पादन कमी राहील, असे दिसत आहे. यामुळे जिनिग प्रेसिंग कारखान्यांत एकूण २२ लाख कापूसगाठींचे (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन येऊ शकते. कमी उत्पादन व उत्पादकतेत घट होत असल्याने रुईचे उत्पादन उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा कमी येईल, असे दिसत आहे.

पाऊस सुरूच आहे. यात कापसाचे उत्पादन कमी होत आहे. कारखानदार व इतर संस्थांचे उद्दिष्ट पूर्ण होणार नसल्याची स्थिती आहे. खानदेशात यंदा यंदा कापूस आवक कमी आहे.

खानदेशात सध्या प्रतिदिन अल्प कापूस आवक होत आहे. नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये प्रतिदिन सरासरी १८ हजार क्विंटल कापसाची आवक मागील हंगामात झाली होती. या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात अत्यल्प कापसाची आवक झाली. आवकेत मागील सात ते आठ दिवसांत कुठलीही वाढ झालेली नाही.

कारण पाऊस सुरू आहे. कापूससाठा शेतकऱ्यांकडे सध्या नाही. यंदा नोव्हेंबरमध्ये कापसाची आवक प्रतिदिन सरासरी १० ते ११ हजार क्विंटल एवढीच राहू शकते. कोरडवाहू कापूस पिकात वेचणी डिसेंबरमध्ये वेगात सुरू होईल. त्याच महिन्यात आवकही बऱ्यापैकी राहील. जशी कापूस वेचणी झाली, तशी त्याची अनेकांकडून विक्री केली जाते.

सध्या जिनिंग प्रेसिंग कारखान्यांतही कापसावर गतीने प्रक्रिया होत नसल्याची स्थिती आहे. खानदेशातील कमाल कारखाने सध्या बंद आहेत. शेतकऱ्यांकडे सध्या खानदेशात कापूससाठा नाही. कापूस कारखानदारांकडे येण्यास कालावधी लागणार त्यावर प्रक्रिया नोव्हेंबरमध्ये गती घेईल. कापूसदर दबावात असल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weekly Weather : पावसाचे प्रमाण कमी-अधिक राहण्याची शक्यता

Grape Pruning : जुन्नरमधील द्राक्ष बागांच्या फळ छाटणीची कामे थांबली

Rain Alert : घाटमाथ्यावर जोरदार पाऊस

Seed Industry : बियाणे उद्योगावरील जाचक नियंत्रणे हटवा

Agriculture Department : ‘लाडक्या कंत्राटदारा’मुळे कृषी पुरस्कार्थी जेरीस

SCROLL FOR NEXT