Silk Cocoon Market
Silk Cocoon Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Silk Cocoon Market : वर्षभरात १३१ टनांवर रेशीम कोषांची खरेदी

माणिक रासवे

Silk Cocoon Market Update : "पूर्णा (जि. परभणी) येथील रेशीम कोष मार्केटमध्ये १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या आर्थिक वर्षात १ हजार ४१० शेतकऱ्यांकडून १३१ टनांवर (१ लाख ३१ हजार १०२ किलो) रेशीम कोष खरेदी (Silk Cocoon Procurement) करण्यात आले. त्यासाठी शेतकऱ्यांना ६ कोटी ८० लाख ५५ हजार ९२६ रुपये मिळाले,’’ अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी गोविंद कदम यांनी दिली.

परभणी जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालया अंतर्गत ही खरेदी झाली. अलीकडील काही वर्षांत मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड आदी जिल्ह्यांतील शेतकरी शेतीपूरक रेशीम शेतीकडे (Silk Farming) वळले आहेत.

काही वर्षांपूर्वी या भागात रेशीम कोष मार्केट नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्नाटकातील बंगलोर जवळील रामनगरम येथील मार्केटमध्ये कोष विक्रीसाठी न्यावे लागत होते. २०१९ मध्ये परभणी जिल्ह्यातील सिकंदराबाद ते मनमाड या रेल्वेमार्गावरील पूर्णा जंक्शन येथे रेशीम कोष मार्केट सुरू झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि वाहतूक खर्चात बचत होत आहे.

प्रतिकिलो ४०० ते ५५० रुपये दर

पूर्णा मार्केटमध्ये परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, जालना तसेच विदर्भातील यवतमाळ, वर्धा आदी जिल्ह्यांतून रेशीम कोषांची आवक होते. २०२२-२३ या आर्थिक वर्षात रेशीम कोषाला प्रतिकिलो किमान ३५० ते कमाल ८५० रुपये, तर सरासरी ४५० रुपये दर मिळाला. बुधवारी (ता.५) रेशीम कोषांची १ हजार किलो आवक होऊन प्रतिकिलो किमान ४०० ते ५५० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पूर्णा मार्केट २०२२-२३ वर्षातील रेशीम कोष खरेदी (टनांत)

महिना...शेतकरी संख्या...रेशीम कोष

एप्रिल...१७५...१४.३९६

मे...५३...३.०६१

जून...५...०.२७०

जुलै...८९..९.०३४८

ऑगस्ट...१९६...२०.००

सप्टेंबर...१०१...७.५६५

ऑक्टोंबर...१७८...१६.७४३

नोव्हेंबर...११६...१०.१७६

डिसेंबर...६९...४.७२६

जानेवारी...६९...५.६१९

फेब्रुवारी...१२५...११.३३१

मार्च...२३४...२८.१७९

परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत शेतकऱ्यांना पूर्णा येथील मार्केट सुविधा मिळाली आहे. कर्नाटक आणि पश्‍चिम बंगाल रामनगरम येथील व्यापारी येऊन रेशीम कोष खरेदी करतात. त्यामुळे चांगले दर मिळतात.
- गोविंद कदम, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, परभणी
मराठवाड्यासह विदर्भातून रेशीम कोषांची आवक होते. स्वयंचलित धागानिर्मिती केंद्राचे काम प्रगतिपथावर आहे. निर्यातक्षम धागा निर्मिती होईल. त्यामुळे मूल्यवर्धन होईल. शेतकऱ्यांच्या कोषांना अधिक दर मिळतील. रोजगार निर्मिती होईल.
- डॉ. संजय लोलगे, संचालक, पूर्णा रेशीम कोष, मार्केट, जि. परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT