Chana Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Procurement : हरभऱ्याची सोमवारपासून वाढीव उद्दिष्टानुसार खरेदी

जिल्ह्यातील हमीभाव हरभरा खरेदी उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे जवळपास २५ दिवसांपासून बंद आहे. प्रशासनाने नवीन वाढीव उद्दिष्ट नेमून दिले आहे.

Team Agrowon

Chana Market Update जिल्ह्यातील हमीभाव (MSP) हरभरा खरेदी (Chana Procurement) उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे जवळपास २५ दिवसांपासून बंद आहे. प्रशासनाने नवीन वाढीव उद्दिष्ट नेमून दिले आहे. त्यानुसार आता सोमवार (ता. ८)पासून पुन्हा हरभरा खरेदी केली जाणार आहे. यासाठी संबंधित खरेदीदार नोडल एजन्सीला जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत.

राज्यातील सात ते आठ जिल्ह्यांत खरेदी उद्दिष्ट पूर्ण झाल्याने हरभरा खरेदी बंद केली होती. यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या घरात हरभरा पडून आहे. या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. यामुळे शासनाने उद्दिष्ट वाढवून द्यावे, यासाठी शेतकरी, लोकप्रतिनिधींनी शासनाकडे मागणी रेटून धरली.

परिणामी, आता शासनाने उद्दिष्ट संपलेल्या जिल्ह्यांना नव्याने उद्दिष्ट वाढवून दिले. त्यानुसार आता बुलडाणा जिल्ह्यात एक लाख ४७ हजार २९६ क्विंटल हरभरा खरेदीचे नवे उद्दिष्ट दिले आहे.

यापूर्वी सुमारे साडे सहा लाख क्विंटल हरभरा खरेदी पूर्ण झालेली आहे. नाफेडमार्फत यावर्षी संबंधित जिल्ह्यातील एकूण उत्पादकतेच्या २५ टक्के हरभऱ्याची खरेदी केली जात आहे. त्यानुसार जिल्ह्याला सहा लाख ५८ हजार क्विंटलचे उद्दिष्ट मिळाले होते.

बुलडाणा जिल्ह्यात केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ‘नाफेड’च्या वतीने हमीदराने हरभरा खरेदी प्रक्रिया राबविली जात आहे.

त्यासाठी सहकारी पणन महासंघ, विदर्भ पणन महासंघ, महाएफपीसी, पृथाशक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनी, विदर्भ अॅग्रिकल्चर अँड अलाइड प्रोड्यूसर कंपनी, महाकिसान संघ कृषी प्रोड्यूसर कंपनी, महाकिसान वृद्धी अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी, महास्वराज्य फार्मर प्रोड्यूसर कंपनी अशा ८ नोडल एजन्सी खरेदी प्रक्रिया राबवीत आहेत.

संदेश मिळाल्यावर हरभरा विक्रीस न्यावा

खरेदीचे संदेश ज्या शेतकऱ्यांना मिळाले आहेत, त्यांनी आपला हरभरा संबंधित केंद्रावर विक्रीसाठी न्यावा, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT