Banana Rate
Banana Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Market Rate : केळीची जाहीर दरांपेक्षा कमी दरात खरेदी

टीम ॲग्रोवन

तळोदा, जि. नंदुरबार : तालुक्यातील चिनोदा, बोरद, रांझणी, मोडसह परिसरात केळी पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड (Crop Sowing) करण्यात येते. मात्र गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे केळी व्यापारी केळीला जाहीर दरापेक्षा कमी दर देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

तळोद्यातील चिनोदासह तळोदा तालुक्यातील बोरद, रांझणी, मोडसह परिसरात केळीची लागवड करण्यात येते. तसेच शहाद्यातील ब्राह्मणपुरी, जवखेडा, सुलवाडा, सुलतानपूर आदी भागांत केळी पीक बारमाही असते.

पिकाला मोठ्या प्रमाणात खत, महागडी केळीची खोडे, निंदणी, ठिबक सिंचन आदी खर्च येतो. तसेच इतर पिकांना तोड म्हणून अनेक शेतकरी केळीलाच अधिक प्राधान्य देतात. शहादा, अक्कलकुवा, तळोदासह परिसरांत अनेक शेतकऱ्यांनी इतर पिकांना पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली आहे.

परंतु व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्‍यांची पिळवणूक करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. खर्च निघणेही अवघड होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

व्यापाऱ्यांकडून शेतकरी वेठीस

केळीला १२०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर बाजार समित्या जाहीर करतात. परंतु या दरात व्यापारी खरेदी करीत नाहीत. जाहीर दरापेक्षा २०० ते ३०० रुपये कमी दर दिला जातो. यात लूट होते. केळीला मागणी नाही, दर्जा खराब असल्याचे कारण सांगून व्यापारी शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. केळीला योग्य दर मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

मागील दोन वर्षांपासून केळीला योग्य हमीभाव (पेपर भाव) मिळेना गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे केळीला योग्य हमीभाव मिळावा.

- महेंद्र सूर्यवंशी, शेतकरी, चिनोदा, ता. तळोदा, जि. नंदुरबार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : केळी विमाधारक वादळात नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित

Poultry Management : तापमान नियंत्रणासाठी पोल्ट्रीशेडवर कोरडा चारा, पाचट, पाण्याचे फवारे

Drought Update : ‘बाहत्तर’च्या दुष्काळाची आठवण होतेय ताजी

Water Scarcity : पाण्यासाठी महिलांची एक किमी पायपीट

Onion Export : कांदा निर्यातीची खोटी बातमी देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल - अनिल घनवट

SCROLL FOR NEXT