Soybean Procurement Process Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Procurement : नाफेडच्या खरेदी केंद्रांवर ७७६ क्विंटल सोयाबीन खरेदी

Soybean Rate : ‘नाफेड’ने सांगली आणि तासगाव या दोन ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू केली आहेत.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात ‘नाफेड’ने सांगली आणि तासगाव या दोन ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. या दोन्ही खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी २५० शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून ६६ शेतकऱ्यांनी ७७६ क्विंटलची सोयाबीनची विक्री केली आहे, अशी माहिती पणन विभागाने दिली आहे.

जिल्ह्यात सोयाबीनचा ३५ हजार हेक्टरवर पेरा झाला होता. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधारभूत दर मिळावा यासाठी नाफेडच्या वतीने विष्णूअण्णा खरेदी विक्री संघट सांगली आणि ॲड. आर. आर. पाटील शेतकरी सह. खरेदी विक्री संघ, तासगाव अशी खरेदी दोन केंद्रे सुरू केली आहेत.

सोयाबीनला किमान आधारभूत दर ४८९२ प्रतिक्विंटल असा आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी या दोन केंद्रांमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सांगली केंद्रावर १२० आणि तासगाव केंद्रावर १३० अशी एकूण २५० शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. या दोन्ही केंद्रांत ६६ शेतकऱ्यांनी ७७६ क्विंटल सोयाबीनची विक्री केली आहे.

वाळवा, कडेगाव, पलूस, शिराळा या तालुक्यांतील शेतकऱ्यांनी प्रत्येक तालुक्यात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेत नसल्याने दोन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

त्यामुळे वाळवा, पलूस, कडेगाव, शिराळा या तालुक्यातील शेतकऱ्यांना सांगली आणि तासगव या ठिकाणच्या केंद्रांचा शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी तासगाव आणि सांगलीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांना प्रतिसाद कमी मिळत असल्याचे चित्र आहे.

सोयाबीन आंतरपीक नियमाच्या कचाट्यात

शासनाने खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी पिकाची नोंद असलेल्या सात-बाराची अट घातली आहे. मात्र, मुख्य पिकात आंतरपीक घेतले असल्यास त्याची नोंद सात-बारावर होत नाही. त्यामुळे ऊस पिकात आंतरपीक म्हणून घेतलेल्या सोयाबीनची नोंद होत नसल्याने शेतकऱ्यांना हमीभावाने सोयाबीन विक्री करण्यासाठी अडचणीचे ठरत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Price Issue: कापसाचे दर पडण्यास शासन जबाबदार

Banana Price: गुणवत्ता निकषावर मालाला मिळणार दर

Agriculture Technology: नव्या तंत्रज्ञानामुळे देशात कृषी क्षेत्रात क्रांती

Global Sugar Production: जागतिक बाजारात साखर पुरवठा वाढणार

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

SCROLL FOR NEXT