Chana  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Procurement : नगर जिल्ह्यात हरभरा खरेदीचा बोजवारा

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीदर मिळावा यासाठी शासनाने हमी केंद्र सुरू केली खरी मात्र, नगर जिल्ह्यात हमी दराने शेतीमाल खरेदीचा बोजवारा उडाल्यासारखी स्थिती आहे.

Team Agrowon

Chana Market Update नगर : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीदर (Chana MSP) मिळावा यासाठी शासनाने हमी केंद्र सुरू केली खरी मात्र, नगर जिल्ह्यात हमी दराने शेतीमाल खरेदीचा (Chana Procurement) बोजवारा उडाल्यासारखी स्थिती आहे.

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने धान्य विक्रीसाठी नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले. परंतु या नोंदणीला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद आहे. अजून तरी शेतमाल केंद्रावर खरेदी झाल्याचे दिसत नाही.

शेतकऱ्याचा शेतीमाल, विशेषतः तूर, हरभरा, मूग, उडीद, सोयाबीन यांसारखी पिके काढणीनंतर बाजारात आवक वाढताच व्यापाऱ्यांकडून धान्याचे दर वाढले जातात.

त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतीमालाला किमान हमीदर मिळावा म्हणून शासनाकडून दरवर्षी केंद्रे सुरू करून शेतीमालाची खरेदी केली जाते.

यंदा तूर, हरभरा खरेदीसाठी नगर जिल्ह्यामध्ये एकरुखे (राहता), बोधेगाव (शेवगाव), जामखेड, कोपरगाव, कर्जत, पारनेर, पाथर्डी, राहुरी, साकत (नगर), मांडवगण (श्रीगोंदा) या दहा ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

या केंद्रांवर यंदा एकही क्विंटल तुरीची खरेदी झाली नाही. विशेष म्हणजे तूर विक्रीसाठी एकाही शेतकऱ्याने नोंदणीही केली नसल्याचे दिसून येत आहे.

हरभरा विक्रीसाठी बोधेगाव, पाथर्डी व पारनेर केवळ तीन केंद्रांवर १०९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे. मात्र अद्यापपर्यंत एकही क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली नाही. विशेष म्हणजे हरभरा, तुरीला हे बाजारात हमीदरापेक्षा कमी दर मिळत आहे.

असे असतानाही हमी केंद्रावर धान्य विक्री करण्यास शेतकरी धजावत नाहीत, याचे कारण काय, हे मात्र कळायला तयार नाही. हमीदराने शेतीमाल विक्रीबाबत शेतकरी नोंदणी करत नाहीत आणि विक्रीही करत नाहीत. त्यामुळे नगर जिल्ह्यात हमी दराने धान्य खरेदीचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Scheme: पशुपालकांसाठी महत्त्वाची योजना; मिळणार शून्य टक्के व्याजावर ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Irrigation Water Management Projects: सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पातर्फे शेतकऱ्यांना तुषार संच वितरित

Fishermen Relief: मच्छीमारांना दिलासा; पाच जिल्ह्यांतील केंद्रांचे आधुनिकीकरण

Rural Water Crisis: चाळीस गावांची पाण्यासाठी वणवण

PMGSY: 'पंतप्रधान ग्राम सडक योजने'ला २०२८ पर्यंत मुदतवाढ, ८३,९७७ कोटींची तरतूद, ग्रामीण वाड्या- वस्त्या शेती बाजारपेठांशी जोडणार

SCROLL FOR NEXT