मार्केट इन्टेलिजन्स

Flex Engine : वाहन कंपन्यांकडून फ्लेक्स इंधन इंजिनची प्रायोगिक निर्मिती सुरू

Raj Chougule

कोल्हापूर : वाहन उद्योगांमध्ये इथेनॉलचा (Ethanol) प्रभावी वापर करण्यासाठी सरकारने फ्लेक्स इंधन इंजिनला (Flex Fuel Engine) प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये विविध कंपन्यांनी याची निर्मिती करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. काही कंपन्यांनी प्रायोगिक तत्त्वावर इंजिन (Flex Engine Production) सुरू करण्यास सुरुवात ही केली असल्याची माहिती केंद्रीय सूत्रांनी दिली.

सरकारला दरवर्षी पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम पदार्थांच्या आयातीसाठी दरवर्षी १५ लाख कोटी रुपये खर्च येतो. याचा मोठा फटका देशाच्या अर्थकारणावर बसतो. हे अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारने इथेनॉलवर आधारित उद्योगाच्या वाढीसाठी प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. इथेनॉलची निर्मिती मुख्यत्वे करून साखर कारखान्याकडून केली जातो. यंदाही गेल्या वर्षीपेक्षा जास्त इथेनॉल तयार होईल याकडे केंद्रशासन लक्ष देत आहे. या अंतर्गत केंद्राने इथेनॉल प्रकल्पाची क्षमता वाढ नवीन इथेनॉल प्रकल्प उभारण्यासाठी भरीव मदत आदी उपाययोजना सुरू केले आहेत.

कारखान्यांनीही याला पसंती दिली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यंदा जास्त इथेनॉलनिर्मिती होईल, असे चित्र आहे. जेवढे जास्त इथेनॉल तयार होईल तितके ते वाहन उद्योगात वापरले जाईल. यामुळे केंद्रीय स्तरावरून इथेनॉल बेस्ड वाहने तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. वाहन उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकी, चारचाकी कंपनीकडून वाहनांसाठी अशा प्रकारचे इंजिन बनवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या देशात पेट्रोलमध्ये १० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिक्स करून ते वाहनांमध्ये वापरले जाते.

फ्लेक्स फ्यूएल इंजिन नेमकं काय करेल?

तुमच्या गाडीच्या टाकीवर लिहिलेलं असतं त्यात पेट्रोल भरायचं की डिझेल. कारण तुमच्या गाडीचं जे इंजिन असतं ते त्या विशिष्ट इंधनासाठी बनवलेलं असतं. दुसऱ्यावर ते चालू शकणार नाही. पण फ्लेक्स फ्यूएल इंजिन असेल तर तुमची गाडी पेट्रोल किंवा इथेनॉलवर ही चालू शकेल. वाहनधारक कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला असता त्यानी या इंजिनवर काम सुरू असल्याचे सांगितले. सर्व बाबींची पडताळणी सुरू आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर वाहने तयार होऊ शकतात. यानंतरच ती प्रत्यक्षात बाजारात आणली जाऊ शकतात. यासाठी त्याची किंमत व अन्य काही फीचर्स पाहूनच ही वाहने येत्या काही वर्षांमध्ये बाजारात येतील. सध्याच्या प्रचलित वाहनांमध्ये मात्र तातडीने बद्दल होण्याची शक्यता नसल्याचे कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

फ्लेक्स इंजिन तंत्रज्ञानात ब्राझील आघाडीवर

फ्लेक्स इंजिन तंत्रज्ञानात ब्राझील जगात आघाडीवर आहे. तिथं कारपासून ट्रकपर्यंत कोट्यवधी वाहनांमध्ये इंधन म्हणून फ्लेक्स इंधन वापरले जाते. ८५ टक्के इथेनॉल आणि १५ टक्के पेट्रोल किंवा डिझेल असे सूत्र या तंत्रज्ञानात असते.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात केंद्राची या वाहनांबाबतची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की अनेक कंपन्या अशा प्रकारचे इंजिन बनवत आहेत. तर काहींनी याचे नियोजन केले आहे. यामुळे भविष्यात फ्लेक्स इंजिन ही भारतात प्राधान्याने वापरली जाईल. इथेनॉल निर्मितीसाठी जादा प्रयत्न करण्याबरोबरच तयार झालेले इथेनॉल ही अन् उद्योगात कशाप्रकारे प्रभावीपणे वापरण्यात येईल याबाबत सातत्याने प्रयत्न आमच्या वतीने सुरू आहेत. बायो-इथेनॉलवर ट्रेन चालवण्याचे तंत्रज्ञान जर्मनीने सिद्ध केले आहे. इथेनॉलची उच्च शुद्ध आवृत्ती विमान वाहतूक उद्योगात देखील वापरली जाऊ शकते, हे कसे करता येईल यावर वैमानिक क्षेत्र संशोधन करत आहे,’’ कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरणांमध्येही इथेनॉल प्रमुख इंधन म्हणून वापरण्यात येऊ शकतो. ऊस तोडणी यंत्रे अथवा अन्य मशागतीची यंत्रे इथेनॉलद्वारे चालल्यास कृषी उद्योगासाठी ही आनंददायी बाब असेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

Natural Disaster in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरवर निसर्ग कोपला; अतिवृष्टी, भूस्खलनानंतर भूकंपाचे धक्के

Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

SCROLL FOR NEXT