Papaya  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Papaya Rate: खानदेशात पपई १५ ते १७ रुपये प्रतिकिलो

Market Update: खानदेशात पपई दरांचा तिढा यंदा फारसा तयार झालेला नाही. मध्यंतरी तिढा होता, तो दूर झाला असून, पपई दर मागील २० ते २५ दिवसांपासून १५ ते १७ रुपये प्रतिकिलो, असे स्थिर आहेत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News: खानदेशात पपई दरांचा तिढा यंदा फारसा तयार झालेला नाही. मध्यंतरी तिढा होता, तो दूर झाला असून, पपई दर मागील २० ते २५ दिवसांपासून १५ ते १७ रुपये प्रतिकिलो, असे स्थिर आहेत.

मागील वेळेस दर महिन्याला दरांचा तयार होत होता. डिसेंबर, जानेवारीत पपईदर अडीच ते तीन रुपये प्रतिकिलो असे होते. सध्या १५ ते १७ रुपये प्रतिकिलोचा दर शेतकऱ्यांना जागेवर किंवा शिवार खरेदीत मिळत आहे. दरवाढीबाबत मध्यंतरी बैठक झाली. त्यात दर १८ ते २० रुपये मिळावेत, अशी मागणी करण्यात आली होती. यानंतर एकही बैठक झालेली नाही व दरांचा तिढाही यंदा नाही.

पपईची काढणी ऑक्टोबरपासून सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक सुमारे चार हजार हेक्टरवर पपई आहे. त्यात शहादा तालुक्यात तीन हजार हेक्टर एवढे पपईचे क्षेत्र आहे. पपईची लागवड धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील यावल, चोपडा, जामनेर, मुक्ताईनगर, रावेर भागातही झाली आहे.

दर महिन्यागणिक कमी झाले आहेत. सुरुवातीला शिवार खरेदीत किंवा थेट जागेवर ३० ते ३५ रुपये प्रतिकलोचे दर मिळाले. नंतर २५ ते ३० रुपये, नोव्हेंबरमध्ये सरासरी २० रुपये प्रतिकिलोचा दर होता. नोव्हेंबरच्या अखेरीस १२ ते १५ रुपये दर होता. नंतर दर कमी झाले. डिसेंबर व जानेवारीत दर कमी होते.

पण जानेवारीच्या अखेरीस दरवाढ झाली. पण उत्पादन खर्चानुसार हा दर परवडत नसल्याची स्थिती आहे. कारण पपईला जेवढा खर्च लागला, तेवढे दर नाहीत, असे चित्र आहे. सध्या किमान २० रुपये प्रतिकिलोचा दर जागेवर मिळावा, अशीही मागणी आहे. खरेदीदार धुळे, नंदुरबार, राजस्थान, दिल्ली या भागांतील आहेत.

शहादा, शिरपूर येथेही अनेक एजंट आहेत. ही मंडळी पपई नाशिवंत असल्याचा व शेतकऱ्यांच्या अडचणीचा लाभ घेते आणि दर कमी करते, असा आरोप केला जात आहे. पपईची पाठवणूक उत्तर भारतात केली जात आहे. सध्या रोज २० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) पपईची आवक खानदेशात होत आहे. पपईला उठाव असल्याने दर स्थिर असल्याची माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT