Orange Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Orange Market: संत्र्याच्या दरात स्थिरता! मृगातील संत्रा ५० हजार रुपये टन दराने विक्रीत

Mrig Season Orange Price: मृग बहरातील संत्र्याची बाजारातील मागणी वाढली असून दर सध्या ५० हजार रुपये प्रति टनावर स्थिर आहे. शेतकरी व व्यापाऱ्यांच्या मते, इतर फळांची उपलब्धता कमी असल्याने हे दर टिकून राहण्याची शक्यता आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News: आंबिया बहरातील फळांची आवक वाढती असल्याने संत्रा फळांचे दर दबावात होते. आता मृग बहरातील फळांची आवक मर्यादित आणि मागणी अधिक असल्याने संत्रा फळाच्या दरातील तेजी टिकून असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. सध्या चांगल्या प्रतिच्या संत्रा फळांना प्रति टन ५० हजार रुपयांचा दर मिळत असून, हा दर स्थिर असल्याची माहिती आहे.

नागपूर जिल्ह्यातील नवअनंत शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक राकेश मानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, द्राक्ष बागांना पावसाचा फटका बसला. परिणामी, द्राक्षाची बाजारातील आवक कमी आहे. त्यासोबतच पंजाब भागात उत्पादित होणाऱ्या किन्नोचा हंगाम देखील अंतिम टप्प्यात आहे.

त्यामुळे ही दरी (गॅप) मृग बहरातील संत्रा फळांच्या माध्यमातून भरून निघत असल्याने बाजारातील तेजी टिकून आहे. मृग बहरातील संत्रा फळांची बाजारात २० जानेवारीपासून आवक सुरू झाली. सुरुवातीच्या फळांना ५० हजार रुपये टन असा दर मिळाला. त्यानंतर आतापर्यंत याच दराने संत्रा फळांचे व्यवहार होत असल्याचे राकेश मानकर यांनी सांगितले.

मार्च अखेरपर्यंत मृग बहरातील संत्रा विक्रीसाठी उपलब्ध राहतो. व्यापाऱ्यांद्वारे बाजाराचा कल लक्षात घेता काही प्रमाणात संत्रा फळांची साठवणूक केली जाते. व्यापाऱ्यांकडील हा संत्रा एप्रिलपर्यंत उपलब्ध होतो. त्या वेळी काही अंशी तेजीचा फायदा होत, असल्याची माहिती त्यांनी दिली.

दोन्ही हंगामांत १० लाख टन उत्पादन

राज्यात सुमारे दीड लाख हेक्‍टरवर संत्रा लागवड आहे. त्यातील एक लाख हेक्‍टर क्षेत्र एकट्या अमरावती जिल्ह्यात, तर २५ हजार नागपूर आणि उर्वरित २५ हजार हेक्‍टर राज्यातील संत्रा लागवडीखालील आहे. यापासून आंबिया आणि मृग बहर अशा दोन्ही हंगामांत १० लाख टन उत्पादन मिळते. याचे वर्गीकरण केल्यास मृग बहरातील संत्रा फळांची उत्पादन तीन, तर आंबिया उत्पादन सात लाख टनांच्या घरात राहते, अशी माहिती संत्रा बागायतदार रमेश जिचकार यांनी दिली.

सध्या बाजारात चांगल्या प्रतीच्या संत्रा फळांना चांगला दर मिळत आहे. याचे ५० हजार रुपये टन याप्रमाणे दर स्थिर आहेत. त्यानंतरच्या प्रतिसाठी सरासरी ३५ हजार रुपये टन इतका दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. बाजारात इतर फळांची उपलब्धता नसल्याने हे दर यापुढील काळात टिकून राहतील, अशी अपेक्षा आहे.
राकेश मानकर, संचालक, नवअनंत शेतकरी उत्पादक कंपनी, मसेपठार, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Heatwave: नांदेडला १३ एप्रिलपासून तापमानाचा पारा ४० अंशांवर

Crop Insurance : सुधारित पिक विमा योजनेमुळे शेतकरी भरपाईपासून वंचित?

Mumbai Pune Missing Link Project: मुंबई- पुणे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार, 'मिसिंग लिंक' खुला

Fertilizer Shop License Suspension: तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर एकवीस निलंबित

India Rainfall Forecast: मे महिन्यात अधिक पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT