Chana  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Procurement: हरभरा खरेदीसाठी ‘शेतकरी उत्पादक’ची केंद्रे कार्यान्वित करा

यंदा मात्र अद्याप शासनाने शेतकरी कंपन्यांच्या खरेदी केंद्रांना मंजुरी न दिल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.

Team Agrowon

Parbhani News : जिल्ह्यात हमीभावाने (प्रतिक्विंटल ५३३५ रुपये) हरभरा खरेदीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांची (Farmers Producers Company) खरेदी केंद्रे कार्यान्वित करावीत, अशी मागणी परभणी जिल्हा शेतकरी उत्पादक संघातर्फे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली.

गेल्या तीन वर्षांपासून गावपातळीवरील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या खरेदी केंद्रांमुळे वाहतूक खर्चात बचत होण्याबरोबरच स्वच्छता व प्रतवारी सुविधा उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांची सोय झाली.

परंतु यंदा मात्र अद्याप शासनाने शेतकरी कंपन्यांच्या खरेदी केंद्रांना मंजुरी न दिल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.

खरेदीदार संस्थांना ऑनलाइन पोर्टल सुविधा उपलब्ध न झाल्याने कागदपत्रांची ऑनलाइन नोंद होऊ शकत नसल्याची खरेदीदार संस्था माहिती देत आहेत.

शासनाने शेतकरी कंपन्यांची खरेदी केंद्रे सुरु न केल्यास बाजारभावातील मोठ्या फरकामुळे आर्थिक नुकसान होत आहे.

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सर्व खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात यावी. या खरेदी केंद्रावर ऑनलाइन नोंदणी तत्काळ सुरु करावी. गोदामांची उपलब्धता करून द्यावी

शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांवर प्रतीक्षा करावी लागू नये यासाठी मुबलक बारदाना उपलब्ध करून द्यावा.जिल्ह्यात हरभरा क्षेत्रात वाढ झाल्याने उत्पादनाच्या ४० टक्यांपर्यंत खरेदी मर्यादा करण्यात यावी.

शासनाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधित यंत्रणांना शेतकरी कंपन्यांची खरेदी केंद्रे सुरु करून नोंदणी प्रक्रिया तत्काळ सुरु करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी परभणी जिल्हा शेतकरी उत्पादक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tomato Onion Prices: आंध्र प्रदेशात कांदा, टोमॅटोचे भाव पडल्याने शेतकऱ्यांचा आक्रोश; टोमॅटो फेकून देण्याची वेळ

Farm Productivity: उत्पादकता वाढली तर भाव पडतील?

Agriculture Scheme Evalution: मोल मूल्यमापनाचे!

Farmer Protest: पाणी भरलेल्या सोयाबीन शिवारात शेतकऱ्याचे आंदोलन

Soil Conservation: मृद्‌संधारणाच्या कामासाठी कृषी अधिकारी कासावीस

SCROLL FOR NEXT