Tur Procurement Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Procurement : हेक्टरी आठ क्विंटलच घेणार, तर उर्वरित तूर विकायची कुठे

Tur Market : राज्यात भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) मार्फत तूर खरेदीची प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र निकष अडथळे ठरू लागले आहेत.

 गोपाल हागे

Buldana News : राज्यात भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) मार्फत तूर खरेदीची प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र निकष अडथळे ठरू लागले आहेत. जिल्ह्यात हेक्टरी आठ क्विंटल तूर खरेदी केली जाणार असून, याचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसणार आहेत.

आठ क्विंटल विक्रीनंतर उर्वरित तुरीचे काय करायचे, असा प्रश्‍न राष्ट्रीय किसान संस्थेचे महासचिव निंबाजी लखाडे पाटील यांनी उपस्थित केला आहे. ‘नाफेड’तूर खरेदीच्या अनुषंगाने ते म्हणाले, की सरकारचे धोरण हे शेतकऱ्यांना जगू द्यायचे नाही आणि मरूही द्यायचे नाही प्रकारचे आहे. माझ्या कुटुंबात मी, माझी दोन मुले असे सर्वमिळून यंदा १२ एकरांत सोयाबीन आणि तूर अशी मिश्र पेरणी केली होती. ‘नाफेड’कडे तूर विक्रीसाठी नोंदणी केली आहे.

सोमवारी (ता. १७) तुरीच्या खरेदीबाबत फोन आला व तुमची तूर एक दोन दिवसांत ‘नाफेड’ केंद्रांवर आणा असे सांगितले. माझ्या व मुलांच्या सातबारावर एकूण तुरीचे क्षेत्र १ हेक्टर दाखविण्यात आले. नाफेडच्या अधिकाऱ्याने ८ क्विंटल ५० किलो तूर केंद्रावर आणण्याची सूचना केली. हा निरोप ऐकून धक्काच बसला.

कारण आम्हाला १२ एकरांतील पिकातून ४० क्विंटल तुरीचे उत्पादन झाले. नाफेड केवळ ८ क्विंटल ५० किलो तूर घ्यायला तयार आहे. अशा वेळी उर्वरित तूर कुठे विकायची असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सरकारने गाजावाजा करून ३ लाख टन तूर खरेदी करणार असे सांगितले. मग सरकार शेतकऱ्यांना एवढी कमी तूर घेऊन कसा दिलासा देत आहे, हा प्रश्‍नच आहे.

मायबाप सरकारला शेतकऱ्यांना जगू द्यायचे नाही अन् मरू सुद्धा द्यायचे नाही. शेतकऱ्याला एकरी ४ ते ५ क्विंटल तूर उत्पादन झाले तर निदान संपूर्ण क्षेत्रानुसार एकरी ४ क्विंटल तूर खरेदीचा आदेश काढला तरच शेतकऱ्यांचा संपूर्ण माल खरेदी होईल. अन्यथा त्याला उर्वरित माल हा बाजारात कमी दराने विकण्याशिवाय पर्याय नाही.
- निंबाजी लखाडे पाटील, महासचिव, राष्ट्रीय किसान संस्था

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lucerne Fodder: एकदा लागवड, तीन वर्षे चारा! पशुपालकांसाठी लसूणघास फायदेशीर

Fruit Insurance Refund: फळ पीकविमा परतावा अप्राप्त

Rabies Prevention Tips: रेबीज रोखण्यासाठी लसीकरणासह जनजागृती आवश्यक

Water Storage: प्रकल्प सलग सातव्या वर्षी १०० टक्के भरले

Fruit Crop Insurance: फळपीक विम्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT