Bedana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Bedana Market : अपेक्षित दराअभावी केवळ ३० टक्के बेदाण्याचा उठाव

Bedana Rate : बेदाण्याच्या मुख्य बाजारात दररोज दोन ते अडीच हजार टन बेदाण्याची आवक होत आहे. मात्र, अपेक्षित दर मिळत नसल्याने केवळ ३० टक्केच बेदाण्याचा उठाव होत आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : बेदाण्याच्या मुख्य बाजारात दररोज दोन ते अडीच हजार टन बेदाण्याची आवक होत आहे. मात्र, अपेक्षित दर मिळत नसल्याने केवळ ३० टक्केच बेदाण्याचा उठाव होत आहे. मात्र, बेदाण्याचे दर टिकून आहेत. बेदाण्याला प्रति किलोस ११० ते १७० रुपये असा दर मिळत आहे.

एप्रिलमध्ये बेदाण्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी बेदाणा दराची परिस्थिती पाहूनच विक्रीसाठी घेऊन यावा, असे आवाहनही व्यापाऱ्यांनी केले आहे.

यंदाच्या हंगामातील नव्या बेदाण्याची आवक फेब्रुवारीपासून सुरू झाली. परंतु नवा बेदाणा बाजारात फारसा आला नाही. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बेदाण्याच्या आवकेत वाढ झाली. होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याला ११० ते १७० रुपये दर मिळाला. आठ दिवसांपासून बेदाण्याचे दर टिकून आहेत.

बेदाणा विक्रीएवजी शीतगृहात

सांगली, तासगाव, पंढरपूर या मुख्य बेदाण्याच्या बाजारात दररोज २ ते अडीच हजार टन बेदण्याची आवक सुरू आहे. मुळात सध्या मागणीच्या तुलनेत बेदाण्याची आवक अधिक असल्याने दरात चढ-उतार होत असल्याचे चित्र आहे.

त्यामुळे शेतकरी बेदाणा विक्री करण्याचे धाडस करत नाहीत. शेतकरी बेदाणा शीतगृहात ठेवण्यासाठी पुढे आले आहेत. तासगाव तालुक्यातील शीतगृहात सुमारे ८० टक्के बेदाणा तर सांगलीत ६० टक्के शेतकऱ्यांनी बेदाणा ठेवला आहे.

गतवर्षीचा बेदाणा १५ टक्के शिल्लक

गतवर्षीचा बेदाणा १५ टक्के शिल्लक आहे. परंतु या शिल्लक बेदाण्याचा नव्या बेदाण्याच्या दरावर फारसा परिणाम झाला नाही. बाजारात दररोज सौद्यासाठी दोन ते अडीच हजार टन बेदाणा विक्रीस येत आहे.

बेदाण्याच्या दराची स्थिती लक्षात आल्यानंतर शेतकरी बेदाण्याची विक्री करत नाही. त्यामुळे एकूण आवकेच्या तुलनेत ३० टक्केच विक्री होत असल्याचे चित्र आहे. बेदाण्याचा उठाव जरी कमी असला तरी बेदाण्याचे दर टिकून आहेत.

जादा दर नव्हे तर दिशाभूल

बाजारात एकूण विक्रीस येणाऱ्या बेदाण्यापैकी लक्झरी मालाचे (उच्च दर्जाचा बेदाणा) प्रमाण कमी आहे. त्यामुळे उच्च दर्जाच्या बेदाण्याला प्रतिकिलो २०० रुपयांपेक्षा अधिक दर मिळत आहे. परंतु व्यापाऱ्यांकडून याच दराची जाहिरात करून शेतकऱ्यांची दिशाभूल करून बेदाणा विक्रीस आणण्यासाठी भाग पाडले जात असल्याचे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT