Onion Rate agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Rate : कांद्याला क्विंटलला २१०० रुपयांपर्यंत दर

Team Agrowon

Nagar News : नगर जिल्ह्यात नगर बाजार समितीसह सर्वच बाजार समित्यांत सध्या कांद्याची आवक जेमतेम होत आहे. कांद्याला सध्या २१०० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल दर मिळत आहे. अजूनही कांद्याला पुरेसा दर नाही.

तसेच यावर्षी कांदा खराब होण्याचे प्रमाण अधिक असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवार, गुरुवार आणि शनिवार असे तीन दिवस कांद्याचे लिलाव होतात.

शनिवारी (ता. २५) झालेल्या लिलावात नगर बाजार समितीत ५३ हजार कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबरच्या कांद्याला १६०० ते २१०० रुपयांचा दर मिळाला तर दोन नंबरच्या कांद्याला १२०० ते १६०० रुपये, तीन नंबरच्या कांद्याला ७०० ते १२०० रुपये, चार नंबरच्या कांद्याला २०० ते ७०० रुपयांचा दर मिळाला.

पारनेर, येथील बाजार समितीमध्ये शुक्रवारी (ता. २४) कांद्याचे लिलाव झाले. कांद्याच्या १०६३४ कांदा गोण्यांची आवक झाली. यामध्ये एक नंबर कांद्याला दोन हजार रुपयांचा सर्वाधिक भाव मिळाला.

राहुरी येथील बाजार समितीच्या आवारात शुक्रवारी (ता. २४) कांद्याला १९०० रुपयांचा भाव मिळाला. येथील बाजार समितीच्या आवारात राहुरीसह शेजारील तालुक्यातील ३०१४६ कांदा गोण्यांची आवक झाली. शेतकऱ्यांनी प्रतवारी करून कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समित्यांकडून करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT