Onion Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

onion Market : जळगावात कांदा दर स्थिर; आवक कमी

कांद्याची आवक यावल, एरंडोल, जळगाव, चोपडा, औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव, सिल्लोड आदी भागातून होत आहे.

Team Agrowon

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या प्रतिदिन ४०० क्विंटल कांद्याची आवक (Onion Arrival) होत आहे. त्यास उठाव आहे. दर्जेदार कांद्याला (Onion Rate) १६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. किमान दर ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल असा आहे.

कांद्याची आवक यावल, एरंडोल, जळगाव, चोपडा, औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव, सिल्लोड आदी भागातून होत आहे. कांद्याला उठाव असल्याने दरही टिकून आहेत. दर्जेदार कांदा चोपडा, एरंडोल व इतर भागातून येत आहे.

तसेच धुळ्यातील साक्री व धुळे तालुक्यातूनही कांदा येत आहे. या भागातून चाळीत साठविलेल्या कांदा अधिक येत आहे. पण त्याचा दर्जा चांगला आहे. जळगाव जिल्ह्यात अतिपावसाने कांद्याचे नुकसान झाले होते. यामुळे आवक कमी राहील, असे संकेत होते. त्यानुसार आवक कमी आहे. लाल कांद्यालाही मागणी आहे.

पण अधिकचा उठाव उन्हाळ किंवा चाळीत साठविलेल्या कांद्यास आहे. या आठवड्यातही कांद्याची आवक स्थिर आहे. मध्यंतरी आवक वाढली होती. ती प्रतिदिन ५०० क्विंटल राहिली. त्या काळात कांद्याचे दर कमाल प्रतिक्विंटल १२०० रुपये असे होते. या काळात कांद्याला उठाव होता. परंतु दरात फारशी सुधारणा दिसत नव्हती. कांदा लागवड पुढेही कमी दिसत असल्याने दर स्थिरावले आहेत.

इंदूर येथील बाजारात विक्री

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील बाजारातही कांद्याची आवक स्थिर आहे. तेथेही कमाल दर १६०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. धुळ्यातही कांद्याची आवक स्थिर आहे. तेथेही प्रतिदिन ८०० क्विंटल कांद्याची आवक होत आहे. धुळे, चोपडा, शिरपूर भागांतील काही शेतकरी आपला कांदा विक्रीसाठी मध्य प्रदेशातील इंदूर येथील बाजारात पाठवीत आहेत. कांद्याची आवक पुढे काहीशी कमी होईल व मागणी चांगली राहील, असे संकेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT