Market Update Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agrowon Podcast: कांदा बाजारभाव दबावातच; आले, पपई, कापूस तसेच काय आहेत सोयाबीनचे दर?

Daily Commodity Rates: सध्या राज्यातील कृषी बाजारात कांद्याचे दर दबावात असून शेतकऱ्यांची मोठी चिंता वाढली आहे. आले व पपई यांचे दर चांगले मिळत असले तरी कापूस व सोयाबीन दर स्थिर आहेत.

Anil Jadhao 

Market Bulletin:

कांदा दबावातच

कांद्याचे बाजारभाव दबावातच आहेत. बाजारातील कांदा आवक वाढल्यानंतर दरावर दबाव वाढला आहे. बाजारात सध्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी आडचणीत आले आहेत. सध्या कांद्याला सरासरी १ हजार ते १ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. कांद्याची आवक एप्रिल महिन्यातही चांगली राहण्याचा अंदाज आहे. याचा दबाव दरावर राहील. त्यामुळे सध्याच्या दरपातळीत काहीसे चढ उतार पाहायला मिळू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

आल्याचे भाव कमीच

राज्यातील सर्वच बाजारांमध्ये आल्याची आवक वाढली आहे. त्याचा परिणाम आल्याच्या दरावर दिसून येत आहे. सध्या आल्याला उठाव असला तरी वाढत्या आवकेमुळे आल्याचे भाव मागील दोन महिन्यात निम्म्यापेक्षा कमी झाले आहेत. सध्या बाजारात आल्याला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते ३ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. यंदा आल्याच्या उत्पादनात वाढल्याचेही शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत. आल्याची बाजारातील आवक काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरातही काहीसे चढ उतार दिसतील, असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

पपईला चांगला उठाव

राज्यातील पपईला सध्या चांगली मागणी आहे. त्यामुळे पपईच्या भावातील तेजी टिकून आहे. पपईचे वाढलेले भाव मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत. वाढती उष्णता आणि रमजान सणामुळे पपईला चांगला उठाव आहे. राज्यातील पपई सध्या देशभरात जात आहे. त्यामुळे पपईला सध्या १७०० ते २ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. यंदा पपईची लागवड सरासरीपेक्षा कमीच होती. त्यामुळे आवकही मर्यादीत आहे. पपईचा बाजारभाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतो, असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

सोयाबीनचे भाव टिकून

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार सुरुच आहेत. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे ९.९८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर देशातील बाजारात सोयाबीनची आवक कमी झालेली आहे. मात्र तरीही सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी ४ हजार ते ४ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारातील सोयाबीनची आवक कमी असली तरी सरकारचा स्टाॅक शिल्लक आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावात चढ उतार कायम राहतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापूस दर टिकून

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव दबावात असले तरी देशात कापसाला उठाव आहे. तर दुसरीकडे सीसीआयची खरेदीही बाजाराला आधार देत आहे. बाजारातील आवकही कमी झाली आहे. त्यामुळे देशात कापसाचे भाव टिकून आहेत. सध्या बाजारात कापसाला सरासरी ७ हजार १०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कापसाची आवक पुढील दोन आठवड्यांत आणखी कमी जाईल. याचा दराला आधार मिळेल. मात्र, सीसीआय कापसाची विक्री काय दरात करते? याचा बाजारावर परिणाम होईल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT