MSP Price Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

MSP Procurement : आधारभूत किमतीने शेतीमाल खरेदीला प्रतिसाद नाही

औरंगाबाद जिल्ह्यात आधारभूत किमतीने शेतमाल खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदीला सुरवात करण्यासाठी २१ जानेवारी २०२३ पासून शेतकऱ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Team Agrowon

Aurangabad MSP News : जिल्ह्यात आधारभूत दराने (MSP Rate) शेतमाल खरेदी योजनेला प्रतिसादच मिळाला नसल्याची स्थिती आहे. आता २१ जानेवारीपासून तुरीच्या हमीदराने खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad District) आधारभूत किमतीने शेतमाल खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदीला सुरवात करण्यासाठी २१ जानेवारी २०२३ पासून शेतकऱ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ६ मार्च २०२३ पर्यंत ही नोंदणीची प्रक्रिया सुरू राहणार आहे.

जिल्ह्यात तालुका खरेदी विक्री संघ गंगापूर, खुलताबाद, वैजापूर, कन्नड, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, औरंगाबाद तसेच संत ज्ञानेश्वर कृषी सेवा सहकारी संस्था पाचोड या ठिकाणी शेतकऱ्यांना तुरीच्या खरेदी करता आपली ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.

याआधी उडीद, मुग व सोयाबीनच्या खरेदीसाठी नोंदणी व खरेदीची मुदत नुकतीच संपली आहे. मुगाची ७७५५ रुपये प्रतिक्विंटल तर उडीदाची ६ ६०० रुपये प्रति क्विंटल व सोयाबीनची ४३०० प्रतिक्विंटल या आधारभूत दराने खरेदी होणार होती.

परंतु मूग, उडीद, सोयाबीनच्या नोंदणीला प्रतिसादच मिळाला नाही, त्यामुळे खरेदीचा प्रश्नच आला नसल्याची स्थिती आहे. आधारभूत किमतीपेक्षा बाजारात संबंधित शेतमालाला जास्त दर मिळाल्यामुळे आधारभूत किमतीने खरेदीला प्रतिसाद मिळाला नसल्याचे बोलले जाते.

आता पुन्हा जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाकडून तुरीची ६६०० रुपये प्रतिक्विंटल या आधारभूत दराने खरेदी केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करता २१ जानेवारीपासून नोंदणी सुरू झाली आहे.

परंतु अजून नोंदणीला प्रतिसाद मिळाला नाही. ६ मार्चपर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीने खरेदीसाठी नोंदणी करण्याची सूचना औरंगाबादच्या जिल्हा पणन अधिकारी एस. के. पांडव यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT