Sugar Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar MSP : साखरेच्या एमएसपी वाढीबाबत संभ्रमावस्था कायम

Sugar Industry : गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या साखरेच्या किमान विक्री दर (एमएसपी) वाढीबाबतच्या निर्णयाबाबत केंद्राने संभ्रम अवस्था कायम ठेवली आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या साखरेच्या किमान विक्री दर (एमएसपी) वाढीबाबतच्या निर्णयाबाबत केंद्राने संभ्रम अवस्था कायम ठेवली आहे. हंगाम अंतिम टप्यात येत असला तरीही निर्णय कधी होणार याबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे.

राज्यसभेत सार्वजनिक अन्न आणि पुरवठा राज्यमंत्री निमुबेन बांभानिया यांनी राज्य सभेत एका प्रश्‍नाला दिलेल्या उत्तरात हा निर्णय कधी होईल याबाबत केंद्राने कोणतीही टाइमलाइन आखून दिली नसल्याचे सांगितले.

यामुळे या निर्णयाबाबत माहिती घेण्याचेच काम सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. साखर उद्योगातून दिल्लीच्या निवडणुका झाल्यानंतर एमएसपी वाढीचाचा निर्णय होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. आता निवडणुका झाल्याने केंद्र हा निर्णय कधी घेते याबाबतचे उत्सुकता आहे.

सध्या देशातील हंगाम हळूहळू अंतिम टप्प्यात येत आहे. प्रत्येक पंधरवड्याचा अहवाल हा साखर उत्पन्नाच्या तुटीचाच येत आहे. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर हंगाम लवकर आटपेल अशी शक्यता आहे. सध्या महाराष्ट्र व कर्नाटकातील हंगाम वेगाने बंद होत आहे. या सर्व परिस्थितीवर केंद्र सरकार नजर ठेवून असल्याचे सूत्रांनी सांगितले.

यंदाचे उत्पादन, संभावित विक्री, इथेनॉलचा वापर, सध्या थोडेसे वाढलेले साखरेचे दर यावर केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे. एकदम एमएसपी वाढीचा निर्णय घेतल्यास किरकोळ बाजारात साखर दर मोठी उसळी घेतील याची भीतीही केंद्राला असल्याने निर्णयासाठी केंद्र वेळ लावत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कारखान्यांचा ताण कायम

सध्या हंगाम संपत असल्याने ऊस उत्पादकांना एफआरपी वेळेत देण्याबाबत दबाव केंद्राकडून साखर कारखान्यांवर येत आहे. एमएसपी वाढीचा निर्णय तातडीने झाल्यास साखर जादा दराने विकून कारखान्यांना पैसे लवकर उपलब्ध करता येतील, अशी आशा होती. निर्यातीचा निर्णय घेऊनही केंद्राच्या एमएसपी वाढीबाबतच्या प्रलंबित निर्णयामुळे कारखान्यांचा ताण कायम असल्याचे कारखाना सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT