Maize Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Market : खानदेशात नवा मका आवक

Maize Rate : खानदेशात मका मळणी सुरू झाली आहे. बाजारात आवक मात्र रखडत सुरू असून, नव्या हंगामातील मक्यास २१५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात मका मळणी सुरू झाली आहे. बाजारात आवक मात्र रखडत सुरू असून, नव्या हंगामातील मक्यास २१५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापसाखालील क्षेत्र कमी करून मका लागवडीस प्राधान्य दिले. मक्याची लागवड खानदेशात सुमारे ३० टक्क्यांनी वाढली.

एकट्या जळगाव जिल्ह्यात ९८ हजार हेक्टरवर मक्याची लागवड झाली होती. तर धुळे, जळगाव व नंदुरबारात मिळून सुमारे एक लाख ३५ हजार हेक्टरवर मका पीक होते. पाऊसमान चांगले राहिल्याने मका पीक जोमात होते. अमेरिकन लष्करी अळीची समस्या पिकात आली होती. ती शेतकऱ्यांनी फवारणी व अन्य खर्च करून आटोक्यात आणली.

वातावरण पूरक असल्याने मका पिकाची बऱ्यापैकी वाढ झाली. वेळेत पाऊस आल्याने पेरण्याही जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण झाल्या होत्या. दोन फवारण्या व दोन वेळेस खतेही शेतकऱ्यांनी मका पिकात दिली. वेळेत किंवा आगाप पेरणी झालेल्या मका पिकाची मळणी मागील आठवड्यात सुरू झाली आहे.

जिल्ह्यात हलक्या, मध्यम जमिनीत पीक लवकर मळणीवर आले आहे. पिकात मळणी करून लागलीच बाजारात मका विक्रीसाठी पाठविला जात आहे. मक्याची आवक शेतकऱ्यांकडून मागील तीन-चार दिवसातच सुरू झाली आहे.

मक्यासाठी खानदेशात जळगावातील जळगाव, चोपडा, चाळीसगाव, अमळनेर, धुळ्यातील दोंडाईचा (ता. शिंदखेडा), धुळे, नंदुरबारातील शहादा, नंदुरबार या बाजार समित्या प्रसिद्ध आहेत.

मागील दोन दिवसांत प्रमुख चार बाजार समित्यांत प्रतिदिन सरासरी एक हजार क्विंटल मक्याची आवक झाली आहे. आवक सध्या रखडत सुरू आहे. कारण मळणीला गती आलेली नाही. काही शेतकरी मळणी करून मका वाळवून घेत आहेत.

यामुळेदेखील आवक सध्या कमी आहे. परंतु पुढील आठवड्यात आवक वाढेल, असे दिसत आहे. कारण मळणीला गती येईल व वातावरण नीरभ्र राहिल्यास आवकही वाढेल. मळणीसह अन्य कार्यवाहीसाठी शेतकरी नीरभ्र, कोरड्या वातावरणाची प्रतीक्षा करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT