Soybean Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Nafed Soybean Procurement: नाफेडची सहा राज्यांमध्ये ८.८४ लाख टन सोयाबीन खरेदी पूर्ण; चार राज्यांमधील खरेदी बंद

Soybean Market Update : नाफेडने सहा राज्यांमध्ये ८ लाख ८४ हजार टन सोयाबीनची हमीभावाने खेरदी केली. आता चार राज्यांमध्ये खरेदीची मुदत संपली आहे. सर्वाधिक खरेदी मध्य प्रदेशात झाली.

Anil Jadhao 

Pune News : नाफेडने सहा राज्यांमध्ये ८ लाख ८४ हजार टन सोयाबीनची हमीभावाने खेरदी केली. आता चार राज्यांमध्ये खरेदीची मुदत संपली आहे. सर्वाधिक खरेदी मध्य प्रदेशात झाली. तर तेलंगणाने खरेदीचे वाढीव उद्दीष्टही पूर्ण केले. महाराष्ट्रात नाफेडची खरेदी ३ लाख १० हजार टनांवरच पोचली आहे. महाराष्ट्रात खरेदीची गती खूपच धिमी आहे. 

नाफेडने सहा राज्यांमध्ये सोयाबीनची खरेदी सुरु केली होती. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान आणि गुजरात राज्यात खरेदी करण्यात आली. यापैकी मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि गुजरात राज्यात खरेदीची मुदत संपली आहे. नाफेड आणि एनसीसीएफ या दोन्ही संस्थांना यंदा देशात ३३ लाख ८५ हजार टन सोयाबीन खेरदीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. मात्र अद्याप खरेदीची गती खूपच कमी आहे. 

नाफेडने आतापर्यंत देशभरात ८ लाख ८४ हजार टन सोयाबीनची खरेदी केली. एनसीसीएफची खरेदी वेगळी आहे. सर्वाधिक खरेदी मध्य प्रदेशात झाली. मध्य प्रदेशात नाफेडने जवळपास ३ लाख ८९ हजार टनांची खरेदी केली. मध्य प्रदेशात यंदा १३ लाख ६८ हजार टन खरेदीचे उद्दीष्ट होते. मध्य प्रदेशातील खेरदी २ जानेवारीला बंद झाली. मध्य प्रदेशात नाफेड आणि एनसीसीएफने एकूण ६ लाख टनांच्या दरम्यान खेरदी केली आहे. मध्य प्रदेशात २५ ऑक्टोबरला सोयाबीनची खेरदी सुरु झाली होती. म्हणजेच एकूण ६९ दिवस खेरदी चालली. पण मध्य प्रदेशने जवळपास ६ लाख टन खरेदी केली. 

महाराष्ट्रातील खेरदी कमी

महाराष्ट्रात सोयाबीनची खरेदी सुरु होऊन ७ जानेवारीपर्यंत ८४ दिवस पूर्ण झाले. पण तरीही महाराष्ट्रात नाफेडने ३ लाख १० हजार टनांचीच खरेदी केली. मध्य प्रदेशने महाराष्ट्रापेक्षा कमी दिवस जास्त खेरदी करून दाखवली. महाराष्ट्रात आतापर्यंत नाफेड आणि एनसीसीएफ मिळून सव्वाचार लाख टनांच्या दरम्यान खरेदी झाली आहे. जी मध्य प्रदेशपेक्षा अजूनही कमी आहे.  

तेलंगणाकडून वाढीव उद्दीष्टही पूर्ण

तेलंगणा राज्याला सुरुवातीला ५९ हजार ५०८  टन खरेदीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. तेलंगणाने हे उद्दीष्ट मुदतीआधीच पूर्ण केले आणि केंद्राकडे आणखी २५ हजार टन खरेदीची परवानगी मागितली होती. तेलंगणाने ७ जानेवारीपर्यंत वाढीव उद्दीष्टही पूर्ण केले. तेलंगणाने एकूण ८४ हजार टनांची खरेदी केली. इतर कोणत्याच राज्याला खेरदीचे उद्दीष्ट साध्य करता आले नाही. शिवाय मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रानंतर तेलंगणात खरेदी झाली.

राज्यनिहाय उद्दीष्ट आणि खरेदी (टनांमध्ये)

राज्य…उद्दीष्ट…खरेदी

महाराष्ट्र…१४ लाख १३ हजार…३ लाख १० हजार

मध्य प्रदेश…१३ लाख ६८ हजार…३ लाख ८८ हजार

कर्नाटक…१ लाख ११ हजार…१८ हजार २८२

तेलंगणा…८४ हजार ५०४…८३ हजार ७५

राजस्थान…२ लाख ९४ हजार…५१ हजार २६

गुजरात…१ लाख १४ हजार…३२ हजार ६८७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Compensation Maharashtra : राज्यात ५ लाख एकर शेतीपिकांचं नुकसान; शेतकऱ्यांना लवकरात-लवकर मदत देणार, कृषिमंत्री भरणे यांची ग्वाही

Fertilizer Stock Approved: अकोला जिल्ह्यासाठी १.१४ लाख टन खत मंजूर

Kiwi Fruit Benefits: रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे किवी

Sugarcane Worker Registration: बीड जिल्ह्यात ५८४५ ऊसतोड कामगारांची नोंदणी पूर्ण

Rain Mango Damage: पूर्वमोसमीचा तडाखा; आंब्यासह भाज्या मातीमोल

SCROLL FOR NEXT