Watermelon Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Muskmelon Rate : खरबूज दर उत्पादन खर्चापेक्षाही कमी

गेल्या दोन वर्षांपासून खरबूज लागवडीत चोपडा, अळनेरातील अमळगाव परिसरात फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

Team Agrowon

Jalgaon News : मागील वर्षापेक्षा या वर्षी खरबूज (Muskmelon) किंवा डांगर कमी आहे. परंतु भावात मात्र घसरण झाली आहे. या वर्षी खरेदी कमी आहे. तसेच परदेशातही कुणी खरेदीदाराने खानदेशातून निर्यात (Muskmelon Market) केलेली नाही.

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च (Production Cost) निघणेही अवघड बनले आहे. खरबुजाचे दर १० ते ११ रुपये प्रतिकिलो एवढेच असून, पिकाला वातावरणातील बदलाचा (Climate Change) फटकाही बसला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून खरबूज लागवडीत चोपडा, अळनेरातील अमळगाव परिसरात फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली. दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत होती. खानदेशात सुमारे ५०० ते ६०० हेक्टरवर खरबूज पीक असते.

मागील वर्षापर्यंत खरबुजास १८ ते २२ रुपये किलोप्रमाणे भाव जागेवर मिळत होता. यामुळे शेतकऱ्यांनी यंदा लागवड क्षेत्रात वाढ झाली. परंतु यंदा दर कमी आहे.शिवाय रोगराई आहे. वेल पिवळे पडणे, पाने आकसणे अशी समस्या पिकात आहे.

अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अमळनेरात दोधवद, हिंगोणा, हिंगोणासिम, कलाली, निंभोरा, जळोद परिसरातील शेतकऱ्यांचे आठ ते दहा कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. एकरी खर्च एक लाख रुपयांवर आला आहे.

पण एकरी चांगले उत्पादन व उत्पन्नही येणार नाही, अशी स्थिती आहे. या वर्षी अमळनेरात लागवडीचे क्षेत्र तिनशे ते साडेतीनशे एकर होते. एकरी किमान उत्पन्न तीन लाख एवढे मागील वेळेस आले होते.

काही शेतकऱ्यांनी बियाणे कंपनीला दोषी ठरवले असून, बियाणे कंपनीनेच खराब बियाणे दिल्याची तक्रार कृषी विभागाकडे केल्याची माहिती मिळाली आहे.

डांगर लागवडीची हिंमत केली, अन्...

खानदेशात कापूस, गहू, ज्वारी, मका ही पिके अधिक असतात. खरबूज किंवा डांगर, कलिंगड यासारखी पिके फारसे शेतकरी घेत नाहीत. कारण वित्तीय खर्च मोठा असतो.

त्यात नुकसान झाल्यास आणखी संकट उभे राहते. पण शेतकऱ्यांनी चांगले भाव मिळतील, यासाठी खरबूज लागवड केली. पण नुकसान झाले आहे.

हवामान बदलामुळे खरबुजाचे उत्पादन घटले असून, भावही कमी मिळत आहे. पिकाचा खर्च निघेनासा झाला आहे. शासनाने याबाबत ठोस भूमिका घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी.
सचिन पाटील, खरबूज किंवा डांगर उत्पादक, वावडे, ता. अमळनेर (जि. जळगाव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT