Soybean Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : हिंगोलीत सोयाबीनच्या दरात किंचित सुधारणा

Market Update : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य बाजारात (भुसार माल मार्केट) मागील काही दिवसांत सोयाबीनच्या दरात १०० ते १५० रुपयांनी सुधारणा झाली.

Team Agrowon

Hingoli News : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य बाजारात (भुसार माल मार्केट) मागील काही दिवसांत सोयाबीनच्या दरात १०० ते १५० रुपयांनी सुधारणा झाली. सोमवारी (ता. ३०) सोयाबीनची १००० क्विंटल आवक होती.

सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ४२०० ते कमाल ४६३६ रुपये तर सरासरी ४४१८ रुपये दर मिळाले. यावर्षीच्या खरिपातील नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरिपात सोयाबीनची २ लाख ८० हजारहून अधिक हेक्टरवर पेरणी झाली आहे. मागील पंधरवाड्यात सोयाबीनची काढणी सुरू झाली आहे.

आर्थिक निकड असलेले शेतकरी नवीन सोयाबीन बाजारात घेऊन येत आहेत. पावसात भिजल्यामुळे सोयाबीनमध्ये आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. परिणामी दर कमी मिळत आहेत. हिंगोली धान्य बाजारात शनिवारी (ता. २८) सोयाबीनची ७०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४२८० ते कमाल ४६७७ रुपये तर सरासरी ४४७३ रुपये दर मिळाले.

शुक्रवारी (ता. २७) ६६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४४०० ते कमाल ४६७३ रुपये तर सरासरी ४५३६ रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २६) ३०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४२१५ ते कमाल ४६४१ रुपये तर सरासरी ४४२३ रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. २५) ५२५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४२६१ ते कमाल ४६५० रुपये तर सरासरी ४४५५ रुपये दर मिळाले.

मंगळवारी (ता. २४) ९९० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४१५० ते कमाल ४५६४ रुपये तर सरासरी ४३५७ रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. २३) १००० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४२८० ते कमाल ४६४१ रुपये तर सरासरी ४४६० रुपये दर मिळाले.

यंदाच्या हंगामातील नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. एकूण दैनंदिन आवकेत २० ते २५ टक्के नवीन सोयाबीन येत आहे. सोयाबीनच्या दरात शंभर ते दीडशे रुपयांनी सुधारणा झाली आहे. किमान आधारभूत किंमतीपर्यंत दर पोहोचू शकतात.
नारायण पाटील, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगोली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचे वितरण सुरू

Agrowon Diwali Article : आदिवासींची निसर्गपूरक शेती

Agrowon Diwali Article: शाश्‍वत शेती पद्धतीशिवाय पर्याय नाही

Soybean MSP : हमीदर ५३२८ रुपयांचा खरेदी केली केवळ ५०० रुपये क्‍विंटलने

Agrowon Diwali Article: स्त्रियांची शाश्‍वत शेती

SCROLL FOR NEXT