Tur Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Market : हिंगोलीत तुरीला कमाल ८ हजार ८९० रुपये दर

हिंगोली बाजार समिती अंतर्गत धान्य बाजार (भूसार मार्केट) मध्ये सोमवार (ता.२४) ते बुधवार (ता.२७) तुरीची २२२१ क्विंटल आवक झाली.

Team Agrowon

Tur Market Update : हिंगोली बाजार समिती अंतर्गत धान्य बाजार (भूसार मार्केट) मध्ये सोमवार (ता.२४) ते बुधवार (ता.२७) तुरीची २२२१ क्विंटल आवक झाली. या वेळी त्यास प्रतिक्विंटल किमान ८ हजार २९५ ते कमाल ८ हजार ८९० रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बुधवारी (ता. २६) तुरीची ६५० क्विटंल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ८ हजार ४०० ते कमाल ८ हजार ८९० रुपये तर सरासरी ८ हजार ६४५ रुपये दर मिळाले.

मंगळवारी (ता.२५) तुरीची ७९० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ८ हजार ३०५ ते कमाल ८ हजार ८८१ रुपये तर सरासरी ८ हजार ५९० रुपये दर मिळाले.

सोमवारी (ता.२४) ७८१ क्विंटल आवक झाली. त्यावेळी किमान ८ हजार २९५ ते कमाल ८ हजार ८०३ रुपये तर सरासरी ८ हजार ५४९ रुपये दर मिळाले.

सेनगाव बाजार समितीत शनिवारी (ता.२९) तुरीची ७० क्विंटल आवक झाली. त्यास क्विंटलला ७ हजार ते ८ हजार रुपये तर सरासरी ७ हजार ५०० रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता.२८) ३५ क्विंटल आवक झाली. त्यास ७ हजार ते ८ हजार रुपये तर सरासरी ७ हजार ५०० रुपये दर मिळाले.

दरात ९५ ते ६०० रुपयांनी सुधारणा

हिंगोली बाजार समिती अंतर्गत कनेरगाव नाका उपबाजारपेठेत शुक्रवारी (ता.२७) तुरीची ३३५ क्विंटल आवक झाली. त्यास किमान ८ हजार २०० ते कमाल ८ हजार ५०० रुपये तर सरासरी ८ हजार ३५० रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता.२६) तुरीची ३९७ क्विंटल आवक होऊन ८ हजार २७० ते ८ हजार ६४० रुपये तर सरासरी ८ हजार ४५५ रुपये दर मिळाले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत तुरीची आवक वाढली आहे. दरात ९५ ते ६०० रुपयांनी सुधारणा झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेच्या दरात वाढ

US Soybean Production: अमेरिकेत सोयाबीन उत्पादन घटण्याचा अंदाज

Monsoon Rain Forecast: राज्यात जोरदार पावसाचा अंदाज कायम

Crop Insurance Scheme : बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विमा अर्जासाठी अंतिम मुदत

Crop Insurance Payment : विमा परतावा खात्यात जमा होण्यास नांदेडमध्ये सुरुवात

SCROLL FOR NEXT