Banana Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Banana Market : खानदेशात दर्जेदार, निर्यातक्षम केळीला शिवार किंवा थेट खरेदीत कमाल ३२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचा दर मिळत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात दर्जेदार, निर्यातक्षम केळीला शिवार किंवा थेट खरेदीत कमाल ३२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचा दर मिळत आहे. तर किमान दर २१०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक आहेत. आवक कमी झाली असून, उठाव वाढला आहे.

दर्जेदार केळी सध्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जामनेर, जळगाव, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, यावल भागांत आहे. रावेर, मुक्ताईनगर भागांत केळीची आवक अल्प आहे. धुळ्यातील शिरपुरातही केळीची आवक कमी आहे.

नंदुरबारातील आवकही अत्यल्प आहे. खानदेशात मिळून रोज ८० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे.

आवकेत मागील काही दिवसांत सुमारे १५ ट्रकने घट झाली आहे. दुसरीकडे सणासुदीसह अन्य बाबींमुळे केळीस उठाव आहे.

खानदेशालगत मध्य प्रदेशातही केळीची आवक घटली आहे. बऱ्हाणपुरातही आवक ७० ते ७५ ट्रक प्रतिदिन आहे. तेथेही कमाल २९५० रुपये दर आहे. केळी दरात मागील सात ते आठ दिवसांत किंचित सुधारणा झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Late Kharif Onion : लेट खरीप कांदा लागवडी १.८२ लाख हेक्टरवर

Onion Crop Damage : शेतकऱ्याने कांद्यावर फिरविला रोटावेटर

Cotton Import : पाकिस्तान ठरला अमेरिकन कापसाचा सर्वांत मोठा आयातदार

Nafed Onion Procurement : ‘नाफेड’च्या कांदा खरेदी गैरव्यवहारांची गांभिर्याने चौकशी

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला हुडहुडी

SCROLL FOR NEXT