Paddy procurement  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Paddy Procurement : सिंधुदुर्गात ४१ हजार ३१६ क्विंटल भातखरेदी

Paddy Market : जिल्ह्यात दरवर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होणारी भातखरेदी यावर्षी १० डिसेंबरनंतर सुरू झाली. जिल्ह्यात तालुका खरेदी-विक्री संघ, सहकारी सेवा संस्थांमार्फत भातखरेदी केली जाते.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यातील ४१ केंद्रांवर भातखरेदी सुरू असून, आतापर्यंत ४१ हजार ३१६ क्विंटल भातखरेदी झाली आहे. भातविक्रीची १ कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना रक्कम वितरित करण्याची प्रकिया सुरू आहे.

जिल्ह्यात दरवर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होणारी भातखरेदी यावर्षी १० डिसेंबरनंतर सुरू झाली. जिल्ह्यात तालुका खरेदी-विक्री संघ, सहकारी सेवा संस्थांमार्फत भातखरेदी केली जाते. जिल्ह्यात खरेदीची ४१ केंद्रे मंजूर आहेत.

त्यापैकी सुरुवातीचा महिनाभर केवळ २६ केंद्रावरच खरेदी सुरू होती. परंतु गेल्या वीस दिवसांत जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ४१ केंद्रांवर भातखरेदी सुरू आहे. जिल्ह्यातील ३ हजार ४८ शेतकऱ्यांनी आतापर्यंत ४१ हजार ४१६ क्विंटल भातविक्री केली आहे.

अजूनही भातखरेदी विक्रीची प्रकिया सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यातील भात उत्पादकांच्या खात्यात भातविक्रीची १ कोटी रक्कम जमा करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ४१ भातखरेदी केंद्रांवर भातखरेदी सुरू असून, ही खरेदी ३१ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. शासनाकडून प्राप्त रक्कम शेतकऱ्यांच्या खाती वितरित केली जात आहे.
- डी. आर. पाटील, मार्केटिंग अधिकारी, सिंधुदुर्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT