Paddy Procurement : सिंधुदुर्गात भात खरेदी लांबली; शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

Paddy Crop : जिल्ह्यात नोव्हेंबरमध्ये सुरू होणारी भात खरेदी अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
Paddy Procurement
Paddy Procurement Agrowon
Published on
Updated on

Sindhudurgnagari News : सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात नोव्हेंबरमध्ये सुरू होणारी भात खरेदी अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. भातखरेदी नेमकी कधी सुरू होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

लांबलेल्या पावसामुळे यावर्षी भातपीक कापणी लांबली. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांकडून भातपीक कापणी सुरू होती. दरम्यान दरवर्षी नोव्हेंबरमध्येच भात खरेदीला सुरुवात केली जाते. मार्केटिंग फेडरेशनच्या नियंत्रणाखाली तालुका खरेदी-विक्री संघ, सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून ही खरेदी केली जाते.

Paddy Procurement
Paddy Procurement : भात खरेदी-विक्री प्रक्रिया होणार सुलभ

भात खरेदी नोंदणी शेकडो शेतकऱ्यांनी केली आहे. पीकपाहणी आणि इतर तांत्रिक गोष्टींमुळे अनेक शेतकऱ्यांची नोंदणीदेखील रखडली आहे. त्यामुळे नोंदणीकरिता शेतकऱ्यांनी मुदतवाढ मागितली आहे. मात्र भातखरेदी सुरू न झाल्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. भातखरेदी नेमकी कधी सुरू होणार याची विचारणा वारंवार शेतकरी तालुका खरेदी-विक्री संघामध्ये जाऊन करीत आहेत.

जिल्ह्यात एकूण ४२ भातखरेदी केंद्रे मंजूर आहेत. या केंद्रावर भातखरेदी होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी भात उत्पादन काहीसे कमी असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.
भातखरेदीकरिता आवश्यक बारदाणे आणि इतर साहित्य उपलब्ध झाले आहे. एकूण सव्वा लाख बारदान्याची मागणीदेखील करण्यात आलेली आहे. पुढील आठवड्यापासून भातखरेदी सुरू होईल.
- डी. आर. पाटील, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, सिंधुदुर्ग

Paddy Procurement
Paddy Procurement : रत्नागिरी जिल्ह्यात १२,३९२ क्विंटल भात खरेदी

भात खरेदीची पूर्वतयारी तालुका खरेदी-विक्री संघामार्फत झाली असून २४ डिंसेबरपासून वैभववाडी तालुका खरेदी-विक्री संघाकडून भातखरेदी केली जाणार आहे.

- सिद्धेश रावराणे, सचिव, तालुका खरेदी-विक्री संघ, वैभववाडी, ता. वैभववाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com