Market Trend Agrowon
मार्केट ट्रेंड

Cotton Market: कापूस लागवड पिछाडीवर; भाव आज बदलले !

Team Agrowon

Cotton Import : देशातील बाजारात कापूस दरातील चढ उतार सुरुच आहेत. कापसाच्या दरात मागील तीन महिन्यांपासून आलेली नरमाई कायम दिसते. तर बाजारातील कापूस आवकही अधिक दिसते. देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस वायदेही स्थिर नाहीत. बाजारात आठवडाभरात ५ ते ६ टक्क्यांपर्यंत चढ उतार दिसत आहेत.

देशातील बाजारात आज कापूस दरात सायंकाळपर्यंत नरमाई दिसून आली. आज बाजाराचा आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बाजारात चढ उतार दिसले, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. वायद्यांचा विचार करता आज सायंकाळपर्यंत कापसाचे वायदे २८० रुपयांनी नरमले होते. दुपारपर्यंत वायद्यांमधील घट ४४० रुपयांची होती. त्यात दुपारनंतर सुधारणा झाली होती. कापूस वायदे ५६ हजार ८०० रुपयांवर होते.

कापूस वायद्यांमध्ये मागील आठवडाभरात मोठे चढ उतार झाले. २९ जूनला वायदे ५४ हजारांवर होते. कापूस वायदे पुन्हा सुरु झाल्यानंतरचा हा सर्वात कमी भाव होता. त्यानंतर दरात सुधारणा होत गेली. ३ जुलै रोजी वायद्यांनी ५७ हजार ८०० रुपयांचा टप्पा गाठला होता. मात्र वायदे निचांकी किंवा वाढलेल्या दरावर स्थिर राहीले नाही. वायद्यांमध्ये नरमाई येऊन आज पुन्हा ५६ हजार ८०० रुपयांचा टप्प गाठला.

आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस वायद्यांमध्ये चढ उतार सुरु आहेत. आज सायंकाळपर्यंत कापूस वायदे ८०.१४ सेंट प्रतिपाऊंडवर होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांचा आढावा घेता १ जून रोजी वायदे ८६ सेंटवर होते. त्यानंतर घट होऊन वायद्यांनी २६ जून रोजी ७७ सेंटपर्यंत मान टाकली. ३० जूनला वायदे पुन्हा ८३ सेंटवर पोचले. त्यानंतर वायद्यांमधील नरमाई कायम राहीली. आंतरराष्ट्रीय बाजारात वायदे नरमल्याने देशातील वायद्यांवरही परिणाम जाणवला.

बाजार समित्यांमध्येही कापूस दरात चढ उतार सुरु आहेत. जून महिन्याच्या शेवटपर्यंत अनेक भागात पाऊस नव्हता. त्यामुळे दरात काहीशी वाढ झाली होती. पण जुलैमध्ये बहुतांशी भागात पाऊस झाला आणि कापूस लागवड सुरु झाल्या. पण आजही कापूस लागवड ११ टक्क्यांनी कमी आहे. यंदा पूर्वहंगामी लागवडीपासूनच पिछाडी कायम आहे. आजपर्यंत देशात ७० लाख ५६ हजार लाख हेक्टरवर कापूस लागवड होती. गेल्या हंगामात ७ जुलैपर्यंतची लागवड ७९ लाख हेक्टर होती. कापूस पट्ट्यात लागवडीयोग्य पाऊस नसल्याने यंदा पेरा माघारलेला दिसतो.

आज देशातील बाजारात अनेक ठिकाणी कापूस दरात क्विंटलमाग १०० रुपयांपर्यंत नरमाई दिसून आली. तर ३५ हजार गाठींच्या दरम्यान आवक होती. आजही कापूस आवक सरासरीपेक्षा ५ पटींनी अधिक राहीली. कापसाचा सरासरी भाव आज ६ हजार ५०० ते ७ हजार ३०० रुपयांचा भाव मिळाला. सरकीचे भाव २ हजार ७०० ते ३ हजार रुपयांवर कायम दिसतात. कापसाचे भाव पुढील काळात पावसाचे प्रमाण, लागवड क्षेत्र आणि बाजारातील आवक यावर अवलंबून राहतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT