Maize Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Maize Market: मक्याचे भाव वाढणार का ?

देशात यंदाच्या खरीप हंगामात मका उत्पादन घटले. गेल्या हंगामात रशिया आणि युक्रेन युद्धामुळे मागील हंगामात मक्याचे दर तेजीत होते. या दोन्ही देशांमधून मक्याची निर्यात ठप्प झाली होती.

Team Agrowon

कापसाचे दर टिकून
1. आंतरराष्ट्रीय बाजारात आज कापसाच्या दरात दुपारपर्यंत जवळपास १ टक्क्याची नरमाई दिसून आली. कापसाचे वायदे १४.७४ सेंट प्रतिपाऊंडपर्यंत नरमले होते. परंतु देशांतगर्त बाजारपेठेत मात्र कापसाचे दर आज स्थिर होते. कापसाचे दर सरासरी ८ हजार ४०० ते ९ हजार रुपये क्विंटल यादरम्यान आहेत. तर कापसाचा कमाल दर ९ हजार २०० रुपयांपर्यंत पोहोचला. बाजाराचा कल आणि मागणी-पुरवठ्याचे गणित बघता येत्या काळात कापसाचे सरासरी दर ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन नरमले

2. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातलेचे दर नरमले होते. दुपारपर्यंत सोयाबीनचे दर जवळपास एक टक्क्याने कमी झाले होते. तर सोयापेंडही एक टक्के नरमले होते. परंतु देशातील बाजारांत मात्र आजही सोयाबीनचे दर स्थिर राहिले. आज देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सोयाबीनचे सरासरी दर प्रति क्विंटल ५ हजार ३०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहिले. मात्र चालू महिन्यात सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता आहे, असे अभ्यासकांनी सांगितले.  

तुरीचे दर तेजीतच

3. देशातील बाजारात आज तुरीची आवक काहीशी वाढली होती. मात्र तुरीचे दर स्थिर होते. आजही तुरीला सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपये क्विंटल दर मिळाला. येत्या काही दिवसांत आफ्रिकेतील तूर आयात कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तुरीचे दर तेजीत राहू शकतात. तुरीला यंदा सरासरी ७ हजार ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

मेथीच्या भाजीचे दर दबावात 

4. राज्यातील बाजारात मेथीची आवक वाढली. त्यामुळे मेथीचे दर दबावात आहे. मेथीला सरासरी प्रतिक्विंटल १ हजार २०० ते १ हजार ४०० रुपये दर मिळत आहे. पुढील काही दिवस मेथीची आवक कायम राहण्याचा अंदाज आहे. दर कायम राहण्याची शक्यता आहे. आवकेचे प्रमाण किती राहते, हा मुद्दा महत्त्वाचा ठरेल, असे  भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी सांगितले. 

मक्याची दरपातळी काय

5. देशात यंदाच्या खरीप हंगामात मका उत्पादन घटले. गेल्या हंगामात रशिया आणि युक्रेन युद्धामुळे मागील हंगामात मक्याचे दर तेजीत होते. या दोन्ही देशांमधून मक्याची निर्यात ठप्प झाली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याची टंचाई निर्माण होऊन दर तेजीत आले होते. त्यामुळे भारतातून मका निर्यात वाढली होती. परिमाणी देशातील मक्याचा साठा कमी होऊन दर वाढले. ऑगस्ट महिन्यात मक्याने प्रति क्विंटल २ हजार ८०० रूपये दराचा टप्पा गाठला होता. मात्र खरिपातील उत्पादन हाती येण्याच्या तोंडावर दर नरमले. त्यातच महिन्याभरापासून पोल्ट्री उद्योग आणि स्टार्च उद्योगाने मका निर्यातबंदीची मागणी लावून धरली आहे. मक्याचे दर वाढल्यामुळे निर्यात बंद करावी, असं त्यांचं म्हणणं आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही दिवसांपासून मक्याचे दर काही अंशी नरमले असले तरी अजूनही आकर्षक आहेत. त्यामुळे निर्यातीसाठी संधी आहे. देशातून मका निर्यात चांगली सुरु आहे. सध्या देशातील मक्याचे खुल्या बाजारात हमीभावापेक्षा जास्त आहेत. यंदा केंद्र सरकारनं मक्याला प्रतिक्विंटल १९६२ रुपये हमीभाव जाहीर केला. तर खुल्या बाजारात मक्याला सध्या प्रतिक्विंटल २ हजार १०० ते २ हजार ३०० रुपये दर मिळत आहे. यंदा खरिपातील मका उत्पादन कमीच राहण्याचा अंदाज आहे. उत्पादनातील घट, रोडावलेला शिल्लक साठा, निर्यातीसाठीची मागणी हे मुद्दे शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे पुढील काळात मक्याच्या दरात क्विंटलमागं २०० ते ३०० रुपयांची सुधारणा होऊ शकते, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT