Chana Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : नाफेडच्या खरेदीचा बाजारावर दबाव का आला?

Team Agrowon

१) सोयाबीनमध्ये चढ उतार (Soybean Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात चढ उतार सुरु आहेत. सोयातेलाच्या भावात मात्र मागील तीन दिवसांपासून काहीशी सुधारणा दिसली. देशातील बाजार मात्र स्थिर आहे. देशात आजही सोयाबीनची आवक १ लाख क्विंटलच्या दरम्यान होती.

तर सरासरी दरपातळी ४ हजार ६०० ते ५ हजार १०० रुपयांच्या दरम्यान आहे. सोयाबीन बाजारात सध्या मोठ्या दरवाढीसाठी अनुकूल असे घटक दिसत नाही. त्यामुळे सोयाबीनच्या दरात २०० रुपयांपर्यंत चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) कापूस आवक जास्तच (Cotton Arrival)

देशातील बाजारात कापसावरील दबाव कायम आहे. कापसाला आज सरासरी ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारातील कापूस आवक कमी असली तरी सरासरीपेक्षा जास्त आहे.

तर दुसरीकडे सुताला उठाव नसल्याचे उद्योगांकडून सांगण्यात येत आहे. याचा दबाव कापूस दरावर येत आहे. कापसाची आवक पुढील काळात आणखी कमी होण्याची शक्यता आहे, असे जाणकारांनी सांगितले.

३) तुरीच्या दरात सुधारणा (Tur Rate)

तुरीच्या दरात आज अनेक बाजारांमध्ये प्रतिक्विंटल २०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली होती. बाजारातील आवक कमीच आहे. पण मागील दोन दिवसांमध्ये तुरीला मागणी वाढली होती. यामुळे तुरीच्या भावात आज क्विंटलमागे २०० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली.

आज तुरीचे भाव ९ हजार ५०० ते १० हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होते. तुरीच्या भावातील तेजी कायम राहील. पण दरात क्विंटलमागं १०० रुपयांचे चढ उतारही दिसू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

४) काबुली हरभरा तेजीत (Kabuli Chana)

देशातील बाजारात सध्या काबुली हरभऱ्याचे भाव तेजीत आहेत. यंदा देशातील उत्पादन घटले. तसेच जागतिक उत्पादनही कमीच आहे. मात्र काबुली हरभऱ्याला उठाव चांगला आहे. निर्यातीला मागणीही वाढत आहे.

त्यामुळे सध्या काबुली हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ११ हजार ते १३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. चालू हंगामातही काबुली हरभरा १५ हजारांचा टप्पा गाठू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

५) खुल्या बाजारात सध्या हरभऱ्याला काय भाव मिळत आहे? (Chana Rate)

हरभरा बाजारात सध्या नाफेडच्या हरभरा विक्रीचा मुद्दा चर्चेला येत आहे. नाफेडची खेरदी आता २३ लाख टनांपर्यंत पोचली. विशेष म्हणजे नाफेडची खेरदी इतिहासातील दुसरी विक्रमी खरेदी झाली. पण बाजारात मात्र भाव ६०० ते ८०० रुपयाने कमी राहिले. एकीकडे सरकार हमीभावाने खरेदी करते. पण दुसरीकडे सरकारच्याच खरेदीचा दबाव बाजारावर राहिला.

नाफेडने मागील हंगामात हरभरा खरेदी करून हमीभावापेक्षा ६०० रुपयाने स्वस्त विकला. विशेष म्हणजे खुल्या बाजारातील दरापेक्षाही हा भाव कमी होता. परिणामी अनेक व्यापारी आणि स्टाॅकिस्ट अडचणीत आले होते.

यंदाही सरकार हाच कित्ता गिरवेल, अशी भीती असल्याने व्यापारी आणि स्टाॅकिस्टनी हमीभावापेक्षा किमान ८०० रुपये कमी भावाने खरेदी केली. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. हरभरा भाव ४ हजार ६०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत.

सरकारच्या अंदाजनुसार यंदा देशात १३५ लाख टन हरभरा उत्पादन झाले. त्यापैकी नाफेडने २३ लाख टन खरेदी केली. शिल्लक ११२ लाख टन हरभरा शेतकऱ्यांना कमी भावात विकावा लागला. पुढील काळातही सरकारच्या हरभरा विक्रीचा दबाव बाजारावर राहील. त्यामुळे हरभरा दरात चांगल्या वाढीची शक्यता धुसरच आहे, असे जाणकारांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT