Cotton, Soybean Market agrowon
मार्केट बुलेटीन

Cotton, Soybean Market : मूग बाजार, गवार दर, कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव | Agrowon

Daily Commodity Market : आज आपण मूग, गवार, गहू, सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

नमस्कार शेतकरी मित्रांनो, अॅग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण पपई, केळी, बाजरी, सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत.

पपईला चांगला उठाव

राज्यातील पपईला सध्या चांगली मागणी आहे. त्यामुळे पपईच्या भावातील तेजी टिकून आहे. पपईचे वाढलेले भाव मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत. वाढती उष्णता आणि रमजान सणामुळे पपईला चांगला उठाव आहे. राज्यातील पपई सध्या देशभरात जात आहे. त्यामुळे पपईला सध्या १७०० ते २ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. यंदा पपईची लागवड सरासरीपेक्षा कमीच होती. त्यामुळे आवकही मर्यादीत आहे. पपईचा बाजारभाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतो, असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

केळी दरात स्थिर

केळीच्या दर मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत. केळीला रमजानमुळे मागणी आहे. केळीच्या आवकेतही काहीशी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम बाजारावर दिसत आहे. केळीच्या भावात मागील काही दिवसांपासून काहीसे चढ उतार सुरु आहेत. सध्या बाजारात सरासरी १८०० हजार ते २ हजार रुपयांचा सरासरी दर मिळत आहे. सध्या बाजारात द्राक्षे, चिकू, कलिंगडाची काढणी सुरू झाली. याचाही परिणाम केळी दरावर झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. केळीच्या दरात चढ उतार कायम राहतील असा अंदाज व्यापारी आणिअभ्यासक वल्यक्त करत आहेत.

बाजरीला चांगली मागणी

बाजरीला सध्या देशात बाजारीला मागणी टिकून आहे. तसेच बाजारातील बाजरीची आवक स्थिरावली आहे. यामुळे दरपातळीही स्थिर दिसत आहे. देशात यंदा बाजरीचे उत्पादन वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत. पण मागणी टिकून असल्याने सध्या बाजारीला सरासरी २ हजार ६०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान वाण आणि गुणवत्तेप्रमाणे मिळत आहेत. बाजारात रब्बीतील बाजरीही दाखल होत आहे. याचा परिणाम दरावर दिसू शकतो, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.

सोयाबीन दबावातच

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात नरमाई आली होती. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १० डाॅलरवर होते तर सोयापेंड ३०० डाॅलरवर होते. देशातही सोयाबीनचा पुरवठा चांगला आहे. केंद्राने यंदा देशात विक्रमी १५१ लाख टन सोयाबीनची उत्पादनाचा अंदाज दिला. बाजारातील आवकही स्थिर आहे. त्यामुळे बाजारात आजही सोयाबीन ३ हजार ७०० ते ३ हजार ९०० रुपयांचा भाव मिळत आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती काही आठवडे कायम राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापसात चढ उतार

देशातील बाजारात कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरुच आहेत. तर बाजारातील कापसाची आवक ९५ हजार गाठींच्या दरम्यान होती. कापसाला उठावही स्थिर आहे. त्यामुळे कापसाचे भाव मागील दोन दिवसांमध्ये अनेक बाजारांमध्ये १०० रुपयांपर्यंत सुधारले होते. बाजारात कापसाला सरासरी ६ हजार ९०० ते ७ हजार १०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. तर आंतरराष्ट्रीय बाजरात कापसाच्या भावातील चढ उतार कायम होते. देशातील बाजारात कापसाची आवक पुढच्या काळात कमी होत जाईल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT