Market Update  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : गव्हाचे भाव टिकून ; कापूस, सोयाबीन, मका, तसेच कांद्याचे काय दर आहेत?

Market Update : आज आपण कापूस, सोयाबीन, गहू, मका आणि कांदा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : सोयाबीनच्या भावातील चढ उतार थांबायचं नाव घेईना. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव १२ डाॅलरच्या आसपास दिसत आहेत. आज दुपारी सोयाबीनचे वायदे १२.१९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे भाव ३७५ डाॅलर प्रतिटनांवर होते.

देशातील बाजारातही सोयाबीनचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत. सोयाबीनचा भाव आजही ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. सोयाबीनवरील हा दबाव आणखी काही दिवस राहू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापूस वायद्यांमध्ये आणखी नरमाई आली. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे ७५ सेंट प्रतिपाऊंडच्याही खाली आले होते. आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे ७४.३३ सेंट प्रतिपाऊंडवर आले होते.

तर देशातील वायदे ५५ हजार ९०० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजारातील कापूस आवक ३६ हजार गाठींवर होती. बाजारातील ही आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. पण कापूस बाजारावरील दबाव आणखी काही दिवक कायम राहण्याची शक्यता आहे. 

कांद्याचे भाव मागील काही दिवसांपासून दबावातच आहेत. सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली मात्र किमान निर्यात मूल्य आणि ४० टक्के निर्यात शुल्कामुळे भारतातून होणारी निर्यात कमी झाली. यामुळे भारतातील कांदा भावावरील दबाव कायम आहे.

कांद्याला सध्या सरासरी भावपातळी १२०० ते १५०० रुपयांच्या दरम्यान आहे. सरकारने निर्यात शुल्क काढल्यास निर्यात वाढून शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळेल, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशात मक्याचा चांगला उठाव आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव पडल्यानंतरही देशात भावपातळी टिकून आहे. सध्या पोल्ट्रीलाही चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे पोल्ट्रीकडून मक्याला मागणी आहे.

तसेच स्टार्च उद्योगाचीही खरेदी सुरुच आहे. त्यामुळे मक्याला २ हजार ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील बाजारात गव्हाची भावपातळी कायम आहे. गव्हाचे घटलेले उत्पादन आणि सरकारची खरेदी याचा गव्हाला आधार मिळत आहे. पण दुसरीकडे सरकारच्या धोरणांचाही दबाव दरावर दिसून येत आहे.

सध्या गव्हाचे भाव ऐन हंगामातही चांगले आहेत. देशभरात सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ३०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT