Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : गव्हाचे भाव टिकून ; कापूस बाजारभाव, सोयाबीन, कांदा, तसेच तूरीचे दर काय आहेत?

Market Update : शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात मोठी नरमाई आली. सोयाबीनचा भाव ११.३७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचला होता. तर सोयापेंड ३४० डाॅलरवर होती. देशातील प्रक्रिया प्लांट्सचे भाव आज ४ हजार ७५० ते ४ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान होते.

देशातील बाजार समित्यांधील भावापातळी ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होती. देशातील बाजारात पुढील काही आठवडे चढ उतार राहतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी दिला. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नरमाई आली. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रत्यक्ष खरेदीतील भाव ९० सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे ५७ हजार ५०० रुपयांवर आले होते.

बाजार समित्यांमध्येही कापसाच्या भावातील नरमाई सुरुच आहे. देशातील बाजारात आजही कापसाला सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. कापूस बाजारात आणखी काही आठवडे चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

तुरीच्या भावातील तेजी कायम आहे.  वाढती मागणी आणि घटलेला पुरवठा, याचा दरावर परिणाम दिसून आला असून वाढ कायम आहे. देशातील महत्वाच्या बाजारात तुरीचा सरासरी ११  हजारांच्या दरम्यान आला.

तर देशभरातील बाजारातील सरासरी भाव १० हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान पोचला. बाजारातील घटती आवक आणि चांगला उठाव यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली. तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील, असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील बाजारात गव्हाचे भाव सध्या टिकून आहेत. बाजारातील गव्हाची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. त्यातच उत्पादकतेला मोठा फटका बसल्याचे शेतकरी  तर काही बाजारांमध्ये मागील महिनाभरात गव्हाचे भाव पुन्हा सुधारले आहेत.

उत्पादन घटीचे अंदाज पुढे आल्यानंतर ही सुधारणा दिसून आली. देशभरात सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ३०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कांद्याच्या भावावरील दबाव कायम आहे. कांद्याची बाजारातील आवक कमी असूनही बाजारभाव वाढताना दिसत नाहीत. सरकारची निर्यातबंदी आणि सरकारच्या इतर धोरणांचा दबाव कांद्यावर कायम आहे.

त्यामुळे सध्या कांदा भाव १००० ते १४०० रुपयांच्या दरम्यान आहेत. देशातील कांदा उत्पादनही यंदा घटले आहे. पण कांदा बाजारातील ही स्थिती सरकारचा दबाव असेपर्यंत राहू शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT