Soybean Rate Agrowon
मार्केट बुलेटीन

Soybean Rate : अमेरिकेतील सोयाबीनची स्थिती काय ?

यंदा जागतिक सोयाबीन उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. सोयाबीन उत्पादनात अमेरिका दुसऱ्या स्थानावर आहे. सध्या अमेरिका आणि भारतातील सोयाबीनचा हंगाम सुरु झाला आहे.

टीम ॲग्रोवन

कापसातील तेजी कायम

1. कापसाच्या दरात आजही क्विंटलमागे १०० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. देशातील बाजारात दिवाळीनंतर कापसाची आवक कमी झाली. त्यामुळं बाजारात कापसाचे दर वाढले आहेत. त्यातच उद्योगांनी आता कापसाची खेरदी सुरु केली. परिणामी कापसाची दरवाढ सुरुच आहे. सध्या कापसाला सरासरी ८ हजार २०० ते ९ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. तिकडं आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे दर वाढत आहेत. त्यामुळं देशातील कापूस दरवाढ कायम राहण्याचा अंदाज व्यक्त होतोय. शेतकऱ्यांना यंदा किमान सरासरी ९ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेूऊनच कापसाची विक्री करावी, असं आवाहन कापूस बाजारातील जाणकारांनी केलंय.

आल्याचे दर दबावात

2. राज्यातील बाजारात सध्या आल्याची आवक वाढत आहे. आवक सरासरीच्या तुलनेत कमीच दिसत असली तरी दर दबावात आहेत. सध्या राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर आणि सातारा बाजार समित्यांमध्ये आल्याची आवक जास्त आहे. मात्र इतर बाजारांमधील आवक तुलनेत कमीच आहे. सध्या आल्याला सरासरी ३ हजार ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. आल्याला कमी दर असल्यानं शेतकरी मात्र अडचणीत आले आहेत. आल्याच्या दरात लगेच सुधारणा होण्याचा अंदाज नसल्याचं बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं.

कारल्याचे दर तेजीत

3. राज्यात सध्या कारल्याला चांगला दर मिळतोय. कारल्याची आवक अद्यापही मर्यादीत दिसतेय. राज्यातील मोठ्या बाजार समित्या वगळता कारल्याची आवक सरासरी १० क्विंटलपेक्षा जास्त नाही. मात्र कारल्याला मागणी टिकून आहे. याचा परिणाम कारल्याच्या दरावर होताना दिसतोय. सध्या कारल्याला प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ३ हजार ३०० रुपये सरासरी दर मिळतोय. कारल्याची बाजारतील आवक कमी असल्यानं दर तेजीतच राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारतील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

केळीला उठाव कमीच

4. यंदाचा हंगाम केळी उत्पादकांसाठी तोट्याचाच ठरला. हंगामाच्या सुरुवातीला केळीचे दर तेजीत होते. मात्र आवक वाढल्यानंतर दरात मोठी घसरण झाली. शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल १२०० रुपयांपासून दर मिळाला. त्यामुळं शेतकरी अडचणीत आले होते. सध्या बाजारातील केळी आवक कमी झाली. मात्र दर अद्यापही ८०० ते १३५० रुपयांच्या दरम्यान आहेत. केळीच्या दरात पुढील काळात सुधारणा होऊ शकते, असं केळी व्यापाऱ्यांनी सांगितलं.

अमेरिकेतील सोयाबीनची स्थिती काय ?

5. जगात ब्राझील, अमेरिका आणि अर्जेंटीना हे महत्वाचे सोयाबीन उत्पादक (Soybean Producer) देश आहेत. यंदा ब्राझील आणि अर्जेंटीना या देशांमध्ये सोयाबीन उत्पादन (Soybean Production) विक्रमी पातळीवर पोचण्याचा अंदाज व्यक्त होतोय. त्यामुळं जागतिक सोयाबीन उत्पादनात ३४९ लाख टनांची वाढ होईल, असा अंदाज युएसडीएनं (USDA) व्यक्त केलाय. मात्र या दोन्ही देशांमध्ये यंदा ला निना स्थितीचा मोठा फटका बसतोय. त्यामुळं उत्पादनाचे अंदाज चुकण्याची दाट शक्यता आहे. या दोन्ही देशांमध्ये सोयाबीनची पेरणी सुरु आहे. तर अमेरिका आणि भारतातील सोयाबीनचा हंगाम सुरु झाला.

युएसडीनं अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन यंदा गेल्यावर्षीपेक्षा ३३ लाख टनांनी कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केलाय. मागील हंगामात अमेरिकेत १ हजार २१५ लाख टन सोयाबीन उत्पादन झालं होतं. तर यंदा १ हजार १८२ लाख टनांवर उत्पादन स्थिरावण्याची शक्यता आहे. ब्राझील आणि अर्जेंटीनातील पिकाबाबत लगेच काही सांगता येणार नाही. तसंच चीनची सोयाबीन खरेदी आता वाढली आहे. मात्र नेमकं अमेरिकेत सोयाबीन उत्पादन घटलं. त्यामुळं जागतिक बाजारात सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात तेजी आली आहे. याचा फायदा भारतीय सोयाबीनलाही मिळतोय. सध्या देशात सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ८०० रुपये दर मिळतोय. सोयाबीनचे दर आणखी काही दिवस सरासरी किमान ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच सोयाबीनची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : छत्रपती संभाजीनगर, बीड, जालन्यात महायुतीच सरस

Solapur Assembly Election Result : सोलापूर जिल्ह्यात भाजपची सरशी

Maharashtra Vidhansabha Election Result : परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश

BJP Dominance : महाराष्ट्रावरील भाजपची मांड पक्की

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

SCROLL FOR NEXT