Turmeric Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : देशातील बाजारात हळदीला काय भाव मिळतोय?

Market Update : बाजारावर आवकेचा दबाव वाढल्यानंतर दरावर आणखी काहीसा दबाव येऊ शकतो. पण यंदा हळदीचा भाव चांगला राहण्याचा अंदाज आहे.

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात चढ उतार सुरुच आहेत. सोयाबीनचे भाव आज दुपारपर्यंत १२.१७ डाॅलरवर होते. तर सोयापेंडने पुन्हा एकदा ३६८ डाॅलरचा टप्पा गाठला होता. देशातील बाजारात सोयाबीन भावावरील दबाव कायम आहे. सोयाबीनची बाजारातील आवक भाव कमी झाल्यानंतरही कायम आहे.

याचाही दबाव भावावर दिसून येतो. सोयाबीनला आजही सरासरी ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपये भाव मिळाला. बाजारातील आवक कायम असेपर्यंत सोयाबीनची ही भावपातळी कायम राहील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव टिकून आहेत. कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात ८५ .१२ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदे काहीसे कमी होऊन ५७ हजार रुपये प्रतिखंडीवर आले होते. बाजार समित्यांमधील आवक आजही कायम होती.

आवकेचा दबाव बाजारावर असून भावपातळी ६ हजार ५०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होती. बाजारातील आवक मर्यादीत झाल्यानंतर कापसाच्या बाजारात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील बहुतांशी बाजारांमध्ये कांद्याचे भाव आता सरासरी १ हजार रुपयांच्या पुढे गेल्याचे दिसते. तरीही भावपातळी उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमीच दिसते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. बाजारातील आवक कायम आहे. पण काही राज्यांमध्ये लाल कांद्याची आवक वाढत आहे. त्यातच निर्यातबंदी आणि नाफेडची विक्री यामुळे कांदा बाजारवर दबाव कायम आहे.

आज देशभरातील बाजारांमध्ये कांद्याला सरासरी १ हजार ते १ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळला. बाजारातील आवक आणखी काही दिवस कायम राहू शकते. त्यामुळे या काळात कांद्याचा भावही कायम दिसू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील बाजारात सध्या हळदीचे भाव स्थिरावले आहेत. संक्रातीपासून काही बाजारात हळदीची आवक सुरु झाली. पुढच्या महिन्यात हळदीची बाजारातील आवक वाढेल. नव्या मालाच्याआवकेमुळे दरात काहीशी नरमाई दिसून येत आहे. पण हळदीचे भाव मर्यादीत पातळीतच नरमले आहेत.

हळद पिकाला यंदा कमी पाऊस, अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसला. यामुळे उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या हळदीला बाजारात १२ हजार ते १४ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारावर आवकेचा दबाव वाढल्यानंतर दरावर आणखी काहीसा दबाव येऊ शकतो. पण यंदा हळदीचा भाव चांगला राहण्याचा अंदाज आहे.

बाजारात संत्रीची आवक सुरु असून भाव दबावात दिसून येत आहेत. त्यातच वाढत्या थंडीमुळे संत्रीला उठाव कमी दिसतो. राज्यातील मोठ्या बाजारांमध्ये संत्रीची आवक जास्त दिसते. मुंबईच्या बाजारात जवळपास ३ हजार क्विंटलची आवक झाली होती. तर नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील बाजारांमध्ये आवक कमी जास्त होती.

संत्र्याला सरासरी २ हजार ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. संत्र्याची आवक कमी होताना दिसत आहे. तसेच थंडी कमी झाल्यानंतर संत्र्याला पुन्हा उठाव मिळू शकतो, त्यामुळे संत्र्याच्या भावालाही आधार मिळेल, असा अंदाज संत्रा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT