Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये चढ उतार सुरुच; कापूस, सोयाबीन, मका तसेच काय आहेत लसूण दर ?

Market Update : शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत कापसाच्या वायद्यांमध्ये नरमाई आली होती. कापूस वायदे पुन्हा ८१ सेंट प्रतिपाऊंडवर आले होते. तर देशातील वायदेही काहीसे कमी होऊन ५८ हजार ४०० रुपयांवर आले.

तर बाजारातील आवक ४८ हजार गाठींवर होती. दुसरीकडे बाजारातील कापसाचा सरासरी भाव कायम होता. आजही कापूस सरासरी ७ हजार २०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील हे चढ उतार आणखी दोन ते तीन आठवड्यांपर्यंत राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम आहेत. आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील बाजारातही सोयाबीनचे भाव स्थिर दिसत नाहीत. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे काहीसे कमी होऊन ११.५८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते.

तर सोयापेंड ३४६ डाॅलरवर आले होते. देशातील बाजारातही सोयाबीन दबावातच आहे. सोयाबीनला आज ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही आठवडे कायम राहू शकते? असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

बाजारात सध्या हिरव्या मिरचीला चांगला भाव मिळत आहे. बाजारातील आवक कमी आणि उठाव मात्र चांगला दिसतो. त्यातच लग्न सराई आणि सणांमुळे हिरव्या मिरचीला चांगल मागणी येत आहे. यामुळे हिरव्या मिरचीचे भाव सध्या तेजीत आहेत.

सध्या हिरव्या मिरचीला ४ हजार ५०० ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तसेच वाढत्या उन्हामुळे मिरची पिकाला फटका बसत आहे. त्यामुळे पुढच्या काळात मिरचीची आवक कमी होत जाईल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

राज्याच्या बहुतांशी भागात उन्हाचा चटका चांगलाच वाढला. त्यामुळे लिंबालाही मागणी वाढली आहे. पण दुसरीकडे बाजारातील लिंबाची आवक कमी झालेली आहे. परिणामी लिंबुला चांगला भाव मिळत आहे.

सध्या बाजारात लिंबुला गुणवत्तेप्रमाणे ६ हजार ते ९ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे. लिंबुचे भाव पुढील काळात आणखी वाढू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

टोमॅटोच्या भावात मागील काही दिवसांपासून नरमाई कायम आहे. टोमॅटोचा भाव बहुतांशी बाजारांमध्ये एक हजार रुपयांपेक्षा कमी झालेला दिसून येत आहे. बाजारातील आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे.

टोमॅटोचे भाव कमी असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. किमान भाव ६०० रुपयांपासून सुरु होत आहे. तर सरासरी भावपातळी एक हजार ते १ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. टोमॅटो बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT