Agriculture Market  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : तुरीच्या भावात चढ उतार कायम; कापूस, सोयाबीन, तूर तसेच लसूण दर काय आहेत?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, तूर, बाजरी आणि लसूण पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीन बाजार मंदीत

सोयाबीनच्या बाजारातील मंदी कायम आहे. सोयाबीनचा भाव आजही १० डाॅलरच्या खालीच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे आज दुपारी ९.८४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंड ३१४ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातही सोयाबीन दबावातच असून सोयाबीनला आजही ४ हजार १०० ते ४ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्पादनवाढीच्या अपेक्षेने सोयाबीन बाजारात मंदी आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसू दबावातच

जागतिक बाजारात घटलेली मागणी आणि पुरवठा वाढीच्या अपेक्षेने बाजारात मंदी आहे. कापसाचा भाव गेले महिनाभर ७० सेंटच्या खालीच दिसत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत सध्या अनिश्चित परिस्थिती असल्याने त्याचा परिणाम कापसाच्या भावावर दिसून येत आहे. 
आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे ६८.८७ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. देशातील बाजारातही सप्टेंबरचे वायदे ५६ हजार ३०० रुपये प्रतिखंडीवर आहेत. तर बाजार समित्यांमधील भाव ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

तुरीचे भाव स्थिरावले

तुरीच्या बाजारात मागील काही आठवड्यांपासून काहीशी नरमाई आली आहे. वाढलेल्या भावात सध्या तुरीची मागणी कमी झाली होती. तसेच आयात सुरळीत सुरु असल्याचा परिणामही दरावर दिसत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे तुरीच्या भावावर काहीसा परिणाम दिसून येत आहे. सध्या तुरीला सरासरी १० हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे. तुरीच्या बाजारात काही आठवड्यांनंतर पुन्हा सुधारणा अपेक्षित आहे, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.    

बाजारीची आवक कायम

बाजारीच्या बाजारातील स्थिती गेल्या दोन महिन्यांपासून कायम आहे. तर दुसरीकडे बाजारीला पावसामुळे काहीसा कमी उठाव मिळत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. याचा परिणाम बाजरीच्या भावावर दिसून येत आहे. बाजारातील आवक सध्या सरासरीपेक्षा कमीच आहे. मात्र बाजारीचा बाजार स्थिर आहे. सध्या बाजरीला सरासरी २ हजार ४०० ते २ हजार ९०० रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारीची आवक खरिपातील माल येईपर्यंत आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरातही काहीशी वाढ अपेक्षित आहे, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

लसणाचे भाव नरमले

राज्यात लसणाचे भाव नरमले आहेत. लसणाची बाजारातील आवक मागणीच्या तुलनेत कमीच आहे. पण लसणाची लागवड वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. त्यामुळे लसणाची मागणी वाढलेल्या भावात काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे सध्या लसणाला प्रतिक्विंटल सरासरी ११ हजार ते १४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. लसणाचा पुरवठा आणखी काही महीने कमी राहू शकतो. त्यामुळे लसणाचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT