Tur Rate Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : तूर बाजारातील तेजी टिकून राहण्याचा अंदाज

Tur Rate : तुरीचे भाव सध्या तेजीत आहेत. तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ते ९ हजार १०० रुपयांचा भाव मिळत आहे.

Team Agrowon

१) सोयाबीनवरील दबाव कायम (Soybean Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात नरमाई पाहायला मिळाली. सोयाबीनचे वायदे आज १३.३३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडने ४२१ डाॅलर प्रतिटनांचा टप्पा गाठला होता.

देशातील बाजारात मात्र सोयाबीनचे दर एकाच पातळीवर ठाण मांडून आहेत. सोयाबीनला देशात सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. सोयाबीन बाजाराची स्थिती पाहता दर स्थिर राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) आंतरराष्ट्रीय बाजारत कापूस सुधारला (Cotton Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात मोठी सुधारणा दिसली होती. कापसाचे वायदे दुपारपर्यंत ८६ सेंट प्रतिपाऊंडवर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात सुधारणा झाल्याने देशातील दर सुधारण्याला मदत होण्याची शक्यता आहे. देशात मागील कापसाच्या भावात सध्या मोठी नरमाई आली आहे.

कापसाचे भाव सरासरी ७ हजार २०० ते ८ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारातील कापसाची आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

३) हरभरा भाव दबावातच (Chana Rate)

देशात सध्या हरभरा भाव दबावातच आहेत. हरभऱ्याला खुल्या बाजारात मागील दोन महिन्यांपासून सरासरी प्रतिक्विंटल ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. तर नाफेडची खेरदीही मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

पण हरभरा बाजाराला आधार मिळताना दिसत नाही. नाफेडची खरेदी सुरु असल्याने खुल्या बाजारात आवक कमी आहे. तरीही बाजारावर दबाव आहे. पुढील काळात हरभरा बाजाराची स्थिती नाफेडच्या विक्रीवर अवलंबून असेल, असे जाणकारांनी सांगितले.

४) कांद्याला अपेक्षेपेक्षा कमी भाव (Onion Rate)

बाजारात सध्या कांद्याचे भाव दबावात आहेत. बाजारात उन्हाळ कांद्याची आवक वाढल्याचा दबाव बाजारावर आहे. पावसामुळे कांद्याचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळे हा कांदा बाजारात येत आहे.

कांद्याला बाजारात गुणवत्तेप्रमाणे सरासरी ७०० ते १ हजार १०० रुपयांचा भाव मिळत आहे. कांद्याचे पावसाने नुकसान झाल्यामुळे हंगामाच्या शेवटी बाजारातील कांदा आवक कमी होऊन दरात तेजी येऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

५) तूर बाजारातील तेजी टिकून राहण्याचा अंदाज (Tur Rate)

तुरीचे भाव सध्या तेजीत आहेत. तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ते ९ हजार १०० रुपयांचा भाव मिळत आहे. देशात सध्या तूर डाळीला चांगला भाव मिळत आहे. लग्न सराई आणि सण समारंभामुळे तुरीच्या डाळीला उठाव आहे. पण सरकार उद्योगांवर दबाव ठेऊन आहे.

सरकारला तुरीचे भाव कमी करायचे आहे. तर उद्योगांना गरजेप्रमाणेही तूर मिळत नसल्याचे उद्योगांच्या वतीने सांगण्यात आले. देशात यंदा तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली. बाजारात आवकही कमी होत आहे.

चांगल्या भावाच्या अपेक्षेने शेतकरी तुरीची विक्री कमी प्रमाणात करत आहे. परिणामी बाजारात तुरीचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे तुरीच्या दरातील तेजी सरकारच्या दबावानंतरही टिकून आहे. म्यानमारमधून आयात होणाऱ्या तुरीचे भावही सध्या तेजीत आहेत.

म्यानमारमधून तूर आयात करायची असल्यास प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ६०० ते ८ हजार ८०० रुपयांचा भाव मिळत आहे. आयात तूर देशातील तुरीपेक्षा महाग झाल्याने देशातील बाजारातही तुरीच्या दरातील तेजी वाढली.

पुढील काळात देशातील बाजारात तुरीच्या दरातील तेजी टिकून राहण्याचा अंदाज आहे. तसेच बाजारात तुटवडा जाणवेल. दरात काहीसे चढ उतारही येऊ शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT