Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : टोमॅटोच्या भावातील नरमाई कायम; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच बाजरी दर काय आहेत?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, बाजरी आणि टोमॅटो पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : सोयाबीन बाजार मंदीत

युएसडीएच्या अहवालानंतर सोयाबीनच्या बाजारातील मंदी वाढली होती. सोयाबीनचा भाव गेल्या ४ वर्षातील निचांकी पातळीवर पोचला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे आज दुपारी ९.५४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंड ३०२ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातही सोयाबीन दबावातच असून सोयाबीनला आजही ४ हजार १०० ते ४ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्पादनवाढीच्या अपेक्षेने सोयाबीन बाजारात मंदी आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसू दबावातच

जागतिक बाजारात घटलेली मागणी आणि पुरवठा वाढीच्या अपेक्षेने बाजारात मंदी आहे. कापसाचा भाव गेले महिनाभर ७० सेंटच्या खालीच दिसत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत सध्या अनिश्चित परिस्थिती असल्याने त्याचा परिणाम कापसाच्या भावावर दिसून येत आहे. 
आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे ६८.९१ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. देशातील बाजारातही सप्टेंबरचे वायदे ५७ हजार १३० रुपये प्रतिखंडीवर आहेत. तर बाजार समित्यांमधील भाव ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कांद्याचा बाजार टिकून

देशातील  बाजारात वाढलेल्या भावात कांद्याला उठाव काहीसा कमी झालेला दिसत आहे. त्याचा दरावरही परिणाम दिसून आला. कांद्याचा भाव ३ हजारांच्या पातळीवरून गेल्या दोन आठवड्यात नरमला आहे. सध्या कांदा २२०० ते २७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कांद्याची निर्यात किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्कामुळे कमी झालेली आहे. तरीही कमी पुरवठा आणि मागणी यामुळे कांदा बाजारातील दराची स्थिती कायम राहू शकते, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत.    

बाजारीची आवक कायम

बाजारीच्या बाजारातील स्थिती गेल्या दोन महिन्यांपासून कायम आहे. तर दुसरीकडे बाजारीला पावसामुळे काहीसा कमी उठाव मिळत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. याचा परिणाम बाजरीच्या भावावर दिसून येत आहे. बाजारातील आवक सध्या सरासरीपेक्षा कमीच आहे. मात्र बाजारीचा बाजार स्थिर आहे. सध्या बाजरीला सरासरी २ हजार ४०० ते २ हजार ९०० रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारीची आवक खरिपातील माल येईपर्यंत आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरातही काहीशी वाढ अपेक्षित आहे, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

टोमॅटोचा बाजार नरमला

टोमॅटोच्या भावावरील दबाव आजही कायम होता. बाजारातील टोमॅटोची आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. त्यामुळे टोमॅटोच्या भावावर दबाव आला. राज्यातील सर्वच भागात टोमॅटोची आवक वाढत आहे. त्यामुळे टोमॅटोला सरासरी १६०० ते २४०० रुपयांच्या दरम्यान भव मिळत आहे. टोमॅटोची बाजारातील आवक पुढील एक-दोन आठवड्यात पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे, असे बाजारातील व्यापारी सांगत आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Jowar Seed Scheme: रब्बी ज्वारी मिनीकिटसाठी नोंदणी करा; कृषी विभागाचे आवाहन

Wetland Ecosystems: पाणथळ सृष्टी व्यवस्थेचे विश्व

Interview with Jaykumar Gore: दुष्काळमुक्ती अन् रोजगारनिर्मितीस प्राधान्य

Spider Mite Issue: वांग्यावरील लाल कोळीची समस्या

Microgreen Farming: नेदरलँड्समधील मायक्रोग्रीन शेती

SCROLL FOR NEXT