Tomato Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : बाजारातील टोमॅटो आवक सरासरीपेक्षा कमीच

Market Update : बाजारातील टोमॅटोची आवकही काहीशी कमी जास्त होताना दिसत आहे. त्याचा परिणाम बाजारावर दिसून येत आहे. सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ५०० ते १ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत.

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात गेले दोन आठवडे सतत नरमाई दाखवत असलेल्या सोयाबीन आणि सोयापेंड बाजाराने आज काहीशी सुधारणा दाखवली. सोयाबीनचे वायदे १२.४७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडने ३६७ डाॅलरचा टप्पा गाठला. देशातील बाजारात मात्र सोयाबीनचा बाजार जागचा हालताना दिसत नाही.

सोयाबीनची बाजारातील आवकही सरासरी दीड लाख क्विंटलच्या दरम्यान कायम दिसते. आजही सोयाबीनला सरासरी ४ हजार ४०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील कापूस बाजारातील आवक कायम आहे. कापसाची आवक १ लाख ९० हजार गाठींच्या दरम्यान होती. आजही महाराष्ट्रातील आवक जास्त आहे. त्यानंतर तेलंगणा, गुजरातमध्ये कापूस विक्रीला येत आहे. कापसाचे भाव दबावात असूनही आवक स्थिरावल्याने भावावर दबाव दिसून येत आहे. वायद्यांमध्येही कापसावरील दबाव कायम आहे.

सध्या कापसाची भावपातळी सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार २०० रुपयांचा भाव मिळाला. बाजारातील कापूस आवक आणखी महिनाभर कायम राहू शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे कापूस बाजारावरील दबावही कायम दिसू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

टोमॅटोच्या भावातील चढ उतार सुरु आहेत. बाजारातील टोमॅटोची आवकही काहीशी कमी जास्त होताना दिसत आहे. त्याचा परिणाम बाजारावर दिसून येत आहे. सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ५०० ते १ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत.

हा सरासरी भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत काहीसा कमी झालेला आहे. टोमॅटोची आवक आणखी काही दिवस चांगली राहू शकते. बाजारातील आवक कमी झाल्यानंतर बाजारालाही आधार मिळू शकतो, असा अंदाज टोमॅटो बाजारातील व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत. 

देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव दबावातच आहेत. सरकारच्या डाळ विक्रीचा दबाव हरभरा बाजारावर दिसून येत आहे. खुल्या बाजारातही हरभरा नरमल्याचे मागील काही आठवड्यांपासून दिसत आहे. सध्या हरभऱ्याला ४ हजार ७०० ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव आहे.

तर हमीभाव ५ हजार ४४० रुपयांपेक्षा हे भाव खूपच कमी आहेत. तर यंदा हरभरा लागवडही कमी झाली. पण सरकार बाजारावर दबाव ठेऊन आहे. त्यामुळे हरभरा बाजार उत्पादन किती होते यावर अवलंबून असेल, असा हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.  

केळीच्या भावात मागील पंधरा दिवसांमध्ये केळीच्या भावात क्विंटलमागे २०० रुपयांची सुधारणा दिसून आली. तसेच हा भाव बाजारात टिकून आहे.मार्गशीर्ष महिन्याच्या सुरुवातीपासूनच केळीला उठाव वाढत गेला. तसेच थंडीचाही फायदा केळी बाजाराला मिळत आहे. त्यामुळे  केळीचा भाव सध्या १ हजार ५०० ते २ हजारांच्या दरम्यान आहेत.

दुसरीकडे बाजारातील केळी आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. याचाही फायदा केली बाजाराला होत आहे. मागणीच्या तुलनेत केळीचे उत्पादन नसल्याने ही दरवाढ आणखी महिनाभर कायम राहील, अशी शक्यता केळी उत्पादक शेतकरी तसेच व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT